कालव्यात बुडणाऱ्या युवतीचे वाचविले प्राण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

वाई - धोम डावा कालव्यात तोल जाऊन पडल्याने पाण्यात वाहत जाणाऱ्या १८ वर्षांच्या युवतीस येथील सोनगीरवाडीतील अमोल सर्जेराव लोहार यांनी धाडसाने बाहेर काढून तिचे प्राण वाचविले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.   

येथील गुलमोहर कॉलनीतील प्रतीक्षा महांगडे ही कपडे धुताना तोल जाऊन धोम डाव्या कालव्यात पडली. तीव्र प्रवाहाच्या पाण्यात सुमारे ३५० फूट वाहत गेली. त्यावेळी सोनगीरवाडीतील अमोल हे जवळच्या इमारतीत काम करीत होते. हा प्रकार समजताच त्यांनी दहा फूट उंचीवरून खाली कालव्यात उडी मारून पोहत जाऊन युवतीस पाण्यातून बाहेर काढले व सुखांजनी हॉस्पिटल येथे तातडीने प्राथमिक उपचारासाठी दाखल केले. युवतीच्या आई-वडिलांनी अमोल यांच्या धाडसाचे कौतुक केले. 

अयोध्यानगर-सोनगीरवाडी येथील श्रीराम गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या उपस्थितीत माजी नगरसेवक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंतराव शेवडे यांच्या हस्ते लोहार यांचा सत्कार झाला. वाई अर्बन बॅंक सोनगीरवाडी शाखा, त. ल. जोशी विद्यालय, जुना मोटार स्टॅण्ड गणेश मंडळ, भगवा कट्टा प्रतिष्ठान मधली आळी यांच्या वतीनेही अमोल यांचा सत्कार करण्यात आला. 

Web Title: wai news satara news girl life saving