esakal | ऑक्सिजन प्लांटला 'यशवंत'ची संजीवनी; सातारा, सांगलीत 1250 लिटरची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

Oxygen Plant

ऑक्सिजन प्लांटला 'यशवंत'ची संजीवनी; सातारा, सांगलीत 1250 लिटरची निर्मिती

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : कोरोना संकटकाळात (Coronavirus) ऑक्सिजनची मोठी कमतरता भासत आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी या आवश्यक असलेल्या यंत्रणेला यशवंत बॅंकेने (Yashwant Bank) दोन कोटींचे सहकार्य केले आहे. त्याव्दारे सातारा व सांगलीतील दोन प्लॅन्टमध्ये पूर्ण क्षमतेने ऑक्सिजन निर्मिती व वितरणाचे काम सुरु झाले आहे. त्यामुळे बॅंकेने योग्यवेळी केलेले अर्थसहाय्य रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरले आहे. (Yashwant Bank Provides 2 Crore For Oxygen Plant Satara News)

कोरोनाचे मागील वर्षीपासून संकट सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होवून आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. अलिकडे रुग्णांना ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड मिळत नाही. त्यामुळे अनेक रुग्ण दगावत आहेत. त्याचा विचार करुन यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी संचालक मंडळाच्या विचारविनीमयाने ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या सातारा येथील भारत डिस्ट्रिब्युटर व सांगली येथील टेक्नोएअर इक्विपमेंट्स या उद्योजकांना त्यांच्या प्लांटची क्षमता वाढवून हॉस्पिटलसाठी ऑक्सिजन निर्मिती करण्याचा आग्रह केला.

माणुसकीला काळीमा! मृताचा चेहरा दाखविण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून शे-पाचशेंची मागणी

त्यानुसार बॅंकेमार्फत संबंधितांना दोन कोटींचे अर्थसहाय्य करण्यात आले. त्याव्दारे सध्या सातारा, सांगली या दोन्ही ठिकाणीचे प्लँट सुरु झाले असून सातारा येथे दररोज ८०० लिटर, तर सांगलीत ४५० लिटर ऑक्सिजन निर्मित होत आहे. त्याव्दारे ५० तरुणांना नव्याने रोजगारही उपलब्ध झाला आहे. बँकेच्या संचालक मंडळाने कोरोनाचे संकट ओळखून अशा उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. त्याअंतर्गत मेक इन इंडिया, स्टार्टअप, आत्मनिर्भर भारत या शासनाच्या योजना प्रत्यक्षात आणणेसाठी उद्योजकांना सहकार्य करण्यासाठी बॅंकेने हा पाऊल टाकल्याचे श्री. चरेगावकर यांनी सांगितले.

अधिकारी जपताहेत बांधिलकी

कोविड काळात अनेक बाधित रुग्ण, त्यांचे नातेवाईक बँकेकडे हॉस्पिटलला भरती करणे, वाहनाची व्यवस्था, घरी जेवणाचा डबा, औषधे, लसीकरण नोंदणी यासाठी मुकुंद चरेगांवकर, वैशाली मोकाशी, श्रद्धा जोशी, सुजित पवार, रुपेश कुंभार हे अधिकारी उत्साहाने याकरिता मदत करत आहेत.

सातारा : शे-पाचशे घेऊन मृताचा चेहरा दाखविणा-यांची हाेणार चाैकशी

केवळ बॅंकींग व्यवहारापुरते मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकीतूनही बॅंकेमार्फत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. सध्या ऑक्सिजनची गरज असून त्याच्या निर्मितीसाठी बॅंकेने दोन कोटींची अर्थसहाय्य केले आहे.

शेखर चरेगावकर, अध्यक्ष, यशवंत बॅंक

Yashwant Bank Provides 2 Crore For Oxygen Plant Satara News

loading image
go to top