कुरणची तरुणाई पाहते ‘हिरवे स्वप्न’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

ओझर - जुन्नर तालुक्‍यातील कुरण गावातील सुमारे शंभर तरुणांनी गेल्या वर्षभरापासून एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी त्यांनी कोणतीच सरकारी मदत न घेता पदरमोड केली आहे. गावात येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा जवळपास ३०० विविध वृक्षांच्या रोपांची लागवड या तरुणाईने केली आहे. त्यांना पाणी देण्यासाठी स्वखर्चाने टॅंकरही विकत घेतला आहे. इतकेच नव्हे तर पाणी देण्याचे काम ते स्वतःच करतात. 

तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीटंचाई जाणवते. अलीकडच्या काळात जलयुक्त शिवारसारख्या योजनांमुळे ओढा खोलीकरण, पाझर तलावांची कामे मार्गी लागल्याने पाण्याची टंचाई असलेल्या गावांना त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. अशीच पाणीटंचाई असलेल्या जुन्नर तालुक्‍यातील कुरण गावची भौगोलिक परिस्थिती पाहता डोंगराच्या कडेला असलेल्या माळरानावर वसलेल्या या गावच्या जवळ पाण्यासाठी कुठल्याही प्रकारचा स्रोत नाही. दक्षिणेच्या बाजूने वाहणारी मीना नदी व उत्तरेच्या बाजूने वाहणाऱ्या कुकडी नदीचे गावापासूनचे अंतर जवळपास पाच किलोमीटर आहे. त्यामुळे अगदी मोजक्‍या शेतकऱ्यांनी शेतीसाठी नदीवरून पाणी आणले आहे; तसेच ही बाब खर्चिक असल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्यामुळे गावच्या लगत असलेला पाझर तलावच गावासाठी वरदान ठरला आहे. या पाण्याचा वापर करून गावातील तरुणांनी गावात येणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला एक वर्षापूर्वी चिंच, वड, पिंपळ, कडुनिंब, गुलमोहर, नीलमोहर, बकुळ, फायकस, मोहगणी, भेंडी यांसारख्या सुमारे ३०० वृक्षांच्या रोपांची लागवड केली होती.

Web Title: youth seen green dream