कचरा जिरवण्यासाठी तरुणांचा पुढाकार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 मे 2017

पिंपरी - कचऱ्याच्या समस्येने गंभीर स्वरूप धारण केलेले असताना दुसरीकडे तरुणांनी घरातला कचरा घरातच जिरविण्याचा उपक्रम सुरू केला आहे. वर्षभरात एका घरात 300 ते 350 किलो कचरा जिरवून त्या माध्यमातून खतनिर्मिती करण्यात येत आहे. या उपक्रमात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्यासाठी या युवकांनी व्हॉट्‌सऍपवर ग्रुप तयार केला असून, त्या माध्यमातून घरातला कचरा कसा जिरवायचा याचे धडे देत आहेत. 

या अनोख्या उपक्रमाविषयी सांगताना संगणक अभियंता अभिजित देशमुख म्हणाले, ""प्लॅस्टिकच्या बादलीमध्ये दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे थर रचले जातात. कचऱ्याचा वास येऊ नये, म्हणून या बादलीला छिद्र केले जाते. कचऱ्याचा ओलावा नियंत्रित करण्यासाठी त्यामध्ये कोकोपीट (नारळाच्या शेड्यांपासून तयार केलेले खत) टाकतो. आठवड्याभरानंतर या कचऱ्यामधून निर्माण झालेले खत बागेत आणि कुड्यांमध्ये टाकतो. पिंपळे सौदागर आणि वाकड परिसरातील 300 घरांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येत आहे.'' हा उपक्रम सुरू केला तेव्हा सुरवातीला कचरा घरात साठविल्यामुळे वास येईल, घरात घाण होईल, असे वाटले होते. मात्र, या उपक्रमाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या खताचा फायदा होत असल्याचे त्यांनी नमूद केले. 

सुरवातीला अवघ्या दहा ते पंधरा जणांपर्यंत मर्यादित असणारा हा उपक्रम आता चांगलाच वाढत आहे. सिद्धार्थ नाईक यांनी या उपक्रमाला गती देण्यासाठी प्रयत्न केल्याचे देशमुख या वेळी म्हणाले. 

यासाठी व्हॉटस्‌ऍपच्या माध्यमातून एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. सध्या या ग्रुपवर शहरातील लोकांबरोबरच मुंबई आणि अन्य शहरातील लोकांचा समावेश आहे. कचरा जिरविण्यासंदर्भात नागरिकांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये व्हिडिओ क्‍लिपबरोबरच कचऱ्याचे वर्गीकरण कसे करायचे, याचे शास्त्रोक्‍त प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे आनंद सीतारामन यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth's initiative for mobilization of waste

टॅग्स