‘यिन’तर्फे २९ मेपासून समर यूथ समिट

‘यिन’तर्फे २९ मेपासून समर यूथ समिट

कोल्हापूर - तारुण्य... नवप्रेरणांचा खळाळता झरा... ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन. मानाने मिरवायचा आणि काहीतरी करून दाखवण्याचा उमेदीचा काळ. शिक्षणाचा एकेक टप्पा पार करीत असतानाच समाज व देशासाठी काहीतरी करण्याची ऊर्मीही गप्प बसू देत नाही. या साऱ्या पार्श्‍वभूमीवर ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’चे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क-‘यिन’ या व्यासपीठाच्या माध्यमातून कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सलग दोन दिवसांचे ‘यिन समर यूथ समिट’चे आयोजन केले आहे.

तरुणाईला उन्हाळ्याच्या सुटीचा सदुपयोग करून ऊर्जा देण्यासाठी व तरुणांनी स्वतःला घडवतानाच देशालाही घडवावे, या हेतूने स्वतःचा शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकास व्हावा म्हणून हे ‘समर यूथ समिट’ मोलाची भूमिका बजावणार आहे. तरुणांमधील सळसळत्या उत्साहाला दिशा देण्यासाठी ‘यिन’ राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये कार्यरत आहे. ‘यिन’ने गेल्या चार वर्षांपासून शिबिरांचे आयोजन सुरू केले आहे. यंदाच्या समर यूथ समिटमध्ये राज्यातील तज्ज्ञ मंडळी तरुणाईशी संवाद साधणार आहेत. यात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास व्यवस्थेसह दोन दिवसांत जेवण, शिबिर किट आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. 

सक्‍सेसफुल बिझनेस, टीम बिल्डिंग, युवा व राजकारण, सेलिब्रेटींशी संवाद, डिजिटल व ऑनलाइन मार्केटिंग आणि सायबर क्राइम, ऑनलाइन बॅंकिंग, स्टार्टअप- द नेक्‍स्ट बिग थिंग, इमेज बिल्डिंग, आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांशी संवाद, क्रीडा व करिअरविषयी मार्गदर्शन, प्रेझेंटेशन स्किल्स अशा विविध विषयांवर विविध सत्रे होतील. यात देश-विदेशातील तज्ज्ञ मार्गदर्शक तरुणाईशी संवाद साधणार आहेत. यातून प्रत्येकाला नवी प्रेरणा आणि दिशा मिळणार आहे. चला तर मग, आजच नोंदणी करू या...!

सहभागासाठी...

  • निवास व्यवस्थेबरोबरच टी शर्ट, डायरी, आयकार्ड, बॅग, जेवण आदी सुविधा सहभागी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. सहभागासाठी संपर्क ः  
  •   कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ः अवधूत (९९७५१३१२७०), सूरज (९९२१७२५६९४)
  •   सांगली ः विवेक (७७२२०७३०४४)
  •   सातारा ः अभिजित (९९२२११०२४०)
  •   कुठे ः डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, कसबा बावडा  
  •   कधी ः २९ व ३० मे 
  •   केव्हा ः सकाळी ९ ते रात्री ९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com