कारण योग्य असेल तरच मिळेल पास ; अन्यथा प्रलंबित

1 thousand 463 epass Communication options in ratnagiri kokan marathi news
1 thousand 463 epass Communication options in ratnagiri kokan marathi news

रत्नागिरी : संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा देण्यासाठी ऑनलाइन पास दिले जात आहेत.  जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ४६३ जणांना पास दिले आहेत. तर  9 हजार 500 अर्ज प्रलंबित  आहेत. असून त्यांच्या विचाराधीन आहेत. योग्य कारण असेल तर त्याची शहानिशा करून पास दिला जाणार आहे, अशी माहिती अपर जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली.

जिल्ह्याच्या शहरी भागात दुचाकीसह सर्वच वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी अधिकृत ई-पास देऊन नागरिकांची गैरसोय टाळण्याचा पोलिस आणि प्रशासनाचा प्रयत्न आहे. म्हणून वाहतूक करता यावी यासाठी ईपास सुविधा सुरू केली आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवा-सुविधा मिळावी  आणि घराबाहेर पडता यावे, यासाठी प्रशासनाने पास देण्याची प्रक्रिया सुरू केली.

जिल्ह्यात 1 हजार ४६३ ईपास​
ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून अत्यावश्यक सेवा-सुविधांसाठी पास मिळण्यासाठी केलेल्या या सुविधेचा काहीजण गैरफायदा घेताना आढळू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी अत्यावश्यक सेवा घरपोच पोहोचवण्यासाठी स्वयंसेवकांची नावे मागवण्यात आली. काही पासदेखील देण्यात आले. मात्र असे पास घेऊन संचारबंदीच्या काळात ते विनाकारण फिरताना आढळून आले.

संचारबंधीत पर्याय; ९ हजार ५०० अर्ज प्रलंबित.​

पोलिस दलातर्फे देण्यात येणाऱ्या ऑनलाइन पास प्रक्रियेतदेखील काहींनी पास मिळवल्याची माहिती समोर आली आहे. अनावश्यक पास घेणाऱ्याची संख्या वाढल्याने पोलिस प्रशासनाने सावध भूमिका घेतली आहे. योग्य प्रकारे पडताळणी करूनच ई पास देण्याची कार्यवाही सुरू  आहे. त्यासाठी पोलिस दलाच्या सायबर सेल मध्ये १९ कर्मचारी दिवस रात्र काम करत आहेत. ज्या वेक्तीना खरी गरज आहे अशांना खात्री करून पास दिले जात आहेत. त्यामुळे ९ हजार ५०० अर्ज प्रलंबित आहेत. शहानिशा करून त्यावर कार्यवाही होणार आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com