Mahindra car  burned down in kudal kokan marathi news.
Mahindra car burned down in kudal kokan marathi news.

भयंकर ; कुडाळमधील जळाली त्यांची कार ; आठ दिवसातील ही दुसरी घटना​..

Published on

कुडाळ (सिंधुदुर्ग) : मुंबई-गोवा महामार्गावरील  पणदूर येथील  सद्गुरू कृपा हॉलचे मालक दिगंबर परब यांची महिंद्रा गाडी जळून खाक झाली ही आग मध्यरात्री  लागली  श्री  परब यांच्या निदर्शनास आल्यानंतर  अग्निशमन दलाच्या सहाय्याने गाडी विझविण्यात आली.

आठ दिवसातील ही दुसरी घटना​

कुडाळ तालुक्यात गेल्या आठ दिवसातील ही दुसरी घटना आहे 
 देशात राज्यात कोरोनाचे संकट असताना  दुसरे संकट हे  दिगंबर परब यांची महिंद्रा गाडी जळून खाक झाल्याने त्यांच्यावर ओढवले आहे त्यांनी सात महिन्यांपूर्वी  गाडी घेतली होती  आज  मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली असावी हे  परब जागे झाल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले.  पहाटे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या सहाय्याने गाडी विझविण्यात आली मात्र, तोपर्यंत गाडी पूर्णपणे  जळून खाक झाली  आग कशामुळे लागली हे  स्पष्ट  झाले नाही एकूणच या घटनेमुळे परब कुटुंब भितीच्या छायेखाली वावरत आहेत याबाबतची माहिती त्यांनी कुडाळ पोलीसाना दूरध्वनीद्वारे कळविली आठ दिवसांपूर्वी नेरूर काडरीवाडी येथील रिक्षा चालक श्री पडते याची रिक्षा जळून खाक झाली होती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com