पालीमध्ये प्लास्टिकमुक्तीसाठी 10 हजार कापडी पिशव्यांचे वाटप

अमित गवळे 
बुधवार, 20 जून 2018

पाली - प्लास्टिक मुक्तीने पर्यावरण जतन व संवर्धनास हातभार लागणार आहे. यासाठी प्लास्टिक पिशव्यांना पर्याय देणे गरजेचे आहे. त्यामुळे अनुपमदादा मित्रमंडळातर्फे पालीत दहा हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

पाली - प्लास्टिक मुक्तीने पर्यावरण जतन व संवर्धनास हातभार लागणार आहे. यासाठी प्लास्टिक पिशव्यांना पर्याय देणे गरजेचे आहे. त्यामुळे अनुपमदादा मित्रमंडळातर्फे पालीत दहा हजार कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

अनुपमदादा मित्र मंडळाच्या सदस्यांनी पालीत घरोघरी व दुकानात जावून या कापडी पिशव्यांचे वाटप केले आहे.त्याच बरोबर येथील दुकानदार व व्यापार्यांना प्लास्टिक पिशव्या न देण्याचे आवाहन केले होते. दुकानदार व व्यापार्यांनी स्वतःहुन पुढे येवून आपल्याकडील प्लास्टिक पिशव्या जमा केल्या. या प्लास्टिक पिशव्या गोळा करुन त्यांची होळी करण्यात आली. सध्या पालीतील नागरीक प्लास्टिक पिशव्यांएैवजी या कापडी पिशव्या बाजारात नेतांना दिसत आहेत असे अनुपमदादा मित्र मंडळाचे अध्यक्ष संदेश सोनकर यांनी सकाळला सांगितले. यामुळे पालीतील प्लास्टिकची समस्या काही प्रमाणात कमी होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागत आहे असे अनुपम कुलकर्णी यांनी सांगितले. येत्या रविवारी या मंडळाकडून गरजू व गरिबांना मोफत छत्र्यांचे वाटप देखील करण्यात येणार आहे.

आमच्या सर्व उपक्रमांना नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. पालीतील प्रदुषण व कचर्याची समस्या मार्गी लावण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. काही दिवसांनी अनुपमदादा मित्र मंडळातर्फे पालीत प्रत्येक इमारत, आळी व सोसायटीमध्ये ओला व सुका कचरा विभागून ठेवण्यासाठी मोफत डस्टबिनचे वाटप करण्यात येणार आहे.
अनुपम कुलकर्णी, पाली

Web Title: 10 thousand cotton bags for plastic removal in Pali