11 fraud cases in ratnagiri on mayor of khed in ratnagiri
11 fraud cases in ratnagiri on mayor of khed in ratnagiri

खेड नगराध्यक्षांवर ११ घोटाळ्यांचे आरोप ; कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार

खेड (रत्नागिरी) : खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यावर विविध अकरा घोटाळ्यासंदर्भात शिवसेनेने अपात्रतेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी आणि नगरविकास मंत्रालयातील सचिवांकडे सादर केला आहे. खेडेकर यांनी नगरपालिकेत लाखो रुपयांचा डिझेल घोटाळा केला आहे. अधिकारांचा गैरवापर करत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला.

खेडमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. कदम म्हणाले, 'वैभव खेडेकरला नगराध्यक्ष पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही. खेडेकर यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची माहिती माहितीच्या अधिकारात मागवलेल्या माहितीमध्ये उघड झाली आहे. 

पालिकेच्या वाहनांव्यतिरिक्त अनधिकृत आणि बेकायदेशीररीत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांमध्येदेखील बेसुमार डिझेल भरले गेले असून, गेल्या तीन वर्षात ७७ लाख रुपयांचा डिझेल घोटाळा केला आहे. पालिकेच्या बंद वाहनांचे नंबर दाखवून हजारो लिटर डिझेल रिचवले गेले. इतर ११ घोटाळ्यांची माहिती पुराव्यांसह खेड नगरपालिकेतील ९ नगरसेवकांच्या सहीने गटनेते प्रज्योत तोडकरी यांच्यामार्फत रत्नागिरी जिल्हाधिकारी आणि नगरविकास मंत्रालयाच्या सचिवांकडे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अपात्रतेबाबत प्रस्ताव सादर केला आहे.

असा झाला डिझेल घोटाळा 

खेडेकर यांनी पालिकेचे मानधन व गाडी तसेच कुठलीही सेवा घेणार नसल्याचे जाहीर केले होते. तसेच ते त्यांच्या खासगी वाहनामध्ये दरमहा २०० लिटर डिझेल भरू शकतात, तिथे त्यांनी स्वतःच्या गाडीत दरमहा ६०० लिटर डिझेल भरून घेतल्याचे माहिती अधिकारातून घेतलेल्या माहितीतून स्पष्ट झाले. त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांच्या, लोकप्रतिनिधींच्या वाहनांमध्ये देखील पालिकेच्या पैशांनी डिझेल भरले आहे. तालुक्‍यातील मनसे कार्यकर्तेदेखील पालिकेच्या डिझेलवर आपली वाहने चालवत आहेत. गेल्या तीन ते चार वर्षांत ७७ लाख रुपयांचा डिझेल घोटाळा खेडेकर यांनी केल्याचे पुरावे जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत, असे कदम यानी सांगितले.

हेही वाचा - बांधकाम कामगारांना मिळणार गृहोपयोगी वस्तूंचा संच - ​

विकासकामांच्या बिलांतही घोळ

पालिका हद्दीतील विविध रस्ते, उद्यानाची कामे, नगरपालिका हद्दीतील पूल आदी विकासकामांची बिले काढताना संबंधित कामाचा दर्जा न पाहता पालिकेचे मुख्याधिकारी अथवा कुणालाही न जुमानता नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत ही बिले काढली आहेत, असा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला.

संपादन - स्नेहल कदम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com