अकरा वर्षाच्या चिमुकलीचा स्वयंरोजगार ; तब्बल दीडशे पणत्यांची केली ऑनलाइन विक्री

11 year old girl used the lockdown period for study and also design by a lamp and online selling rupees 30 in sindhudurg
11 year old girl used the lockdown period for study and also design by a lamp and online selling rupees 30 in sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग) : सहावी इयत्तेत शिकणाऱ्या साईशा उगवेकर या पणदूर (ता. कुडाळ) येथील एका चिमुकलीने शिक्षणाचे ऑनलाइन धडे घेत असतानाच, पणत्या रंगविण्याचीही कला आत्मसात केली. तब्बल दीडशे पणत्या आकर्षक रंगानी सजवून त्याची ऑनलाइनच्या माध्यमातून विक्रीही करून स्वयंरोजगाराचा आदर्श बालवयात निर्माण केला आहे.

यंदाच्या कोरोना महामारीत शाळा अजूनही बंद आहेत. त्यामुळे ऑनलाइन माध्यमातून मुलांचा अभ्यास आणि वर्ग घेतले जात आहेत. यानिमित्ताने फेसबुक, युट्यूब आदींचा परिचय झालेल्या साईशा नीलेश उगवेकर या अकरा वर्षीय मुलीने युट्यूब मधील काही व्हिडिओ पाहून पणत्या रंगविण्याची कला शिकून घेतली. पालकांकडून बाजारातून मातीच्या पणत्याही मागवून घेतल्या.

मागील दोन महिने या पणत्यांवर आकर्षक रंगरंगोटी आणि सजावटीमध्ये साईशा गुंतून गेली होती. दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर साईशाने आपल्या आणि पालकांच्या फेसबुकच्या माध्यमातून या पणत्या विकत घेण्याचे आवाहन केले आहे. आकर्षक रंगसंगती असलेल्या या पणत्यांना जिल्ह्यातील अनेकांनी मागणी नोंदवली आणि ३० रूपये एक या दराने सर्व दीडशे पणत्यांची विक्री देखील झाली.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com