रायगड - सुधागडमधील 12 डिजीटल शाळांचे संयुक्तिक उद्घाटन

अमित गवळे  
मंगळवार, 17 एप्रिल 2018

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील 12 डिजिटल शाळांचे संयुक्तिक उद्घाटन राजिप शाळा नवघर येथे करण्यात आले. अशा प्रकारचे संयुक्तिकरित्या डिजिटल शाळांचे उद्घाटनाचा कार्यक्रम हा पहिलाच असल्याचे म्हणले जात आहे. मिडटाऊन रोटरी पनवेल आणि राजिप शाळा पिलोसरीचे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांच्या माध्यमातून दोन वर्षात जिल्ह्यतील तब्बल २५ शाळा डिजिटल  झाल्या आहेत.

पाली (रायगड) : सुधागड तालुक्यातील 12 डिजिटल शाळांचे संयुक्तिक उद्घाटन राजिप शाळा नवघर येथे करण्यात आले. अशा प्रकारचे संयुक्तिकरित्या डिजिटल शाळांचे उद्घाटनाचा कार्यक्रम हा पहिलाच असल्याचे म्हणले जात आहे. मिडटाऊन रोटरी पनवेल आणि राजिप शाळा पिलोसरीचे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांच्या माध्यमातून दोन वर्षात जिल्ह्यतील तब्बल २५ शाळा डिजिटल  झाल्या आहेत.

या कार्यक्रमास मिडटाऊन रोटरी पनवेलचे अध्यक्ष विलास कवानपुरे, सेक्रेटरी फुलपगार, प्रोजेक्ट चेअरमन विकास चव्हाण व सदस्य तसेच नवघर चे देणगीदाते व कार्यक्रम अध्यक्ष कॅप्टन रावसाहेब, प.स.सदस्य रमेश सुतार, गटशिक्षणाधिकारी कुलकर्णी, सरपंच राजश्री  सुतार, शा.व्य. स.अद्यक्ष रवींद्र जाधव व सदस्य ग्रामस्थ, 12 शाळांचे प्रतिनिधी, केंद्रप्रमुख, साधनव्यक्ती, ग्रामप्रवर्तक, सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मुख्यध्यपक जगदिश म्हात्रे व सहकारी यांनी केले.

यावेळी रोटरीने पुढील वर्षात अजून शाळा डिजिटल करण्याबरोबरच स्वच्छतागृह, सॅनिटरी नॅपकिन मशीन सुधागड साठी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी 25 शाळा डिजिटल केल्याबद्दल रोटरीला प्रशस्तिपत्रक मिळाले. राजेंद्र अंबिके यांना रोटरी मार्फत सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास स्वागत म्हणून पाहूण्यांना रोप वाटप करण्यात आले. 

डिजिटल शाळांचा प्रवास
२०१६ रोजी सुधागड मधील पहिली डिजिटल राजिप शाळा पिलोसरी मिडटाऊन रोटरीच्या माध्यमातून झाली आणि ग्रामीण भागातील अशा प्राथमिक शाळा डिजिटल करण्याचे अभिवचन रोटरीने शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र अंबिके यांना दिले. त्यातूनच अंबिके यांच्या प्रयत्नातून व पाठपरव्यातून जिल्ह्यातील एकूण 25 शाळा डिजिटल झाल्या. रोटरी अन अंबिके यांच्या कार्याने आज या शाळेतील मुले ई लर्निंग द्वारे स्मार्ट शिक्षण घेत आहेत. भविष्यात मिडटाऊन रोटरी शिक्षणात अश्याच प्रकारची मदत वृद्धीगत करतील आणि हा दुवा असाच वाढत राहणार असल्याचे अंबिके यांनी सकाळला सांगितले.

सन २०१६-१७ पहिल्या टप्यात एकूण १३ शाळा डिजिटल झाल्या तर २०१७-१८ या दुसऱ्या टप्यात 12 शाळा डिजिटल झाल्या

सुधागड तालुका 12  राजिप डिजिटल शाळा - 
करचुंडे, वावलोली,सिद्धेश्वर, पाच्छापूर,ठाणाळे,विजयनगर,बहिरमपाडा, कवेले, शिरसेवाडी,नवघर,वावे, वाघोशी
अलिबाग तालुका 1  राजिप डिजिटल शाळा - 
के.इ. एस.बारिया, प्राथमिक शाळा-पेझारी
पनवेल तालुका 1  राजिप डिजिटल शाळा - 
शाळा-वळवली
मुरुड तालुक्यातील 11 राजिप डिजिटल शाळा -
मिठागर, खामदे,टोकेखर,राजपुरी,डोंगरी, शिघरे,खार, आंबोली,विहूर, सातिर्डे, गोपाळवट, या दोन वर्षात 25 शाळा डिजिटल झाल्या.
 

Web Title: 12 digital schools from sudhagad inaugurated once