खासदारनिधीतून १२ लाखांचा निधी दिव्यांगांच्या कल्याणासाठी - श्रीपाद नाईक

अवित बगळे
शुक्रवार, 8 जून 2018

पणजी - जनतेचा पैसा जनतेच्या कल्याणासाठीच वापरणे हे खासदार आणि मंत्री म्हणून कर्तव्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज खासदारनिधीतून दिव्यांगांना तीन चाकी स्कुटर्सचे वाटप करण्यात आले. 

१० दिव्यांगांना तीन चाकी स्कुटर्स, ४० जणांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून उत्तम प्रतीचे जयपूर फूट आणि इतर साधने मिळवून दिले, असे यावेळी नाईक यांनी सांगितले. दिव्यांगांना मदत करण्यासाठी खासदारनिधीतून १२ लाख रूपयांचा निधी वर्ग करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. दिव्यांगांचा समाजातील वावर सुलभ व्हावा, यादृष्टीने जी मदत करता येईल, ती करण्याचा आपला नेहमीच प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.   

Web Title: 12 lakhs fund for the welfare of the people - Shripad Naik