esakal | रत्नागिरीत ८ कोटींच्या प्रस्तावात होणार १३ धरणांची दुरुस्ती
sakal

बोलून बातमी शोधा

13 kokan dam correction and proposal of rupees 8 crore in ratnagiri

सिंचनाबाबतची उदासीनता कायम आहे. फक्त १ टक्के एवढे सिंचन क्षेत्र आहे.   

रत्नागिरीत ८ कोटींच्या प्रस्तावात होणार १३ धरणांची दुरुस्ती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानंतर पाटबंधारे विभाग धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिक सतर्क झाला आहे. धरणांना लागलेली गळती, पडझड आदी महत्त्वाच्या दुरुस्तीसाठी सुमारे ८ कोटींचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाने शासनाला सादर केला आहे. यामध्ये जिल्ह्यातील १३ धरणांचा समावेश आहे. मात्र, सिंचनाबाबतची उदासीनता कायम आहे. फक्त १ टक्के एवढे सिंचन क्षेत्र आहे.   

तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. या घटनेने जिल्ह्यातील सर्व धरणांच्या सुरक्षेवर भर दिला आहे. जिल्ह्यात अजूूनही ८ धरणे धोकादायक आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसामध्ये या धरणामध्ये पाणीसाठा केला नाही. पाटबंधारे विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये जिल्ह्यातील १३ धरणांची दुरुस्ती महत्वाची आहे. 

हेही वाचा - हृदयद्रावक: ऐन दिवाळी सणाच्या दिवशीच हर्णे पाळंदे येथे दोन तरुणांचा बुडून मृत्यू

त्यासाठी या विभागाने सुमारे ८ कोटींचा प्रस्ताव तयार केला. प्रस्तावामध्ये नातूवाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी १ कोटी, पिंपळवाडी २५ लाख, घोळवली १ कोटी, मालघर २५ लाख, गुहागर ३५ लाख, शिपोशी २५ लाख, तळवडे १ कोटी, पंचनदी १५ लाख, पंधेरी २५ लाख, बेणी ५० लाख, पन्हाळे १ कोटी, तेलीवाडी ५० लाख या धरणांचा यामध्ये समावेश आहे. धरणांची गळती, पडझड थांबविणे आदींचा समावेश आहे. 
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे; मात्र समूहशेती किंवा दुबार पीक घेण्याच्या दृष्टीने अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. एकूणच पाणीसाठ्याचा आणि सिंचन क्षेत्राचा विचार करता फक्त १ टक्केच सिंचन क्षेत्र आहे.  

८ धरणे असुरक्षित

जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या ३ मध्यम प्रकल्पांसह ६५ लघुधरणे आहेत. यातील ५७ धरणे सुरक्षित असून ८ धरणे असुरक्षित आहेत. पाटबंधारे विभागाने धरणांच्या सुरक्षिततेला जास्त महत्त्व दिले आहे. त्या अनुषंगाने मध्यम व लघु प्रकल्पांबाबतचा अहवाल दर आठवड्याला प्रसिद्ध केला जातो. 

हेही वाचा -  चक्क बॅंकेचीच केली फसवणूक ; १४ लाखाचे नकली दागिने ठेवले गहाण -

"तिवरे धरणानंतर जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील १३ धरणांच्या दुरुस्तीसाठी ८ कोटींचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे."

 - जगदीश पाटील, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग (दुरुस्ती)

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top