esakal | रत्नागिरी एका आठवड्यात दाखल झाले तब्बल एवढे चाकरमानी
sakal

बोलून बातमी शोधा

13000 Chakarmanis arrived in ratnagiri

गणेशोत्सवानिमित्त आणखी चाकरमानी जिल्ह्यात येत आहेत. त्यासाठी एसटीची व्यवस्था आहे.

रत्नागिरी एका आठवड्यात दाखल झाले तब्बल एवढे चाकरमानी

sakal_logo
By
राजेश शेळके

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. तरीही संसर्ग आटोक्‍यात आलेला नाही. यातच गेल्या सात ते आठ दिवसांमध्ये तब्बल 13 हजार चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले. मुळातच वैद्यकीय सुविधांचा अभाव, कमी मनुष्यबळ आदींचा विचार करता कोरोना फैलाव रोखण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. 

हेही वाचा - आम्ही दलाल नाही तर शेतकरी आहोत, कोकणच्या विकासासाठी नाणार आवश्यकच..

जिल्ह्यात रात्री उशिरा आणखी 82 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 148 इतका झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यात सुरवातीच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये जिल्ह्याला चांगले यश आले. मुंबई, पुणे आदी भागात कोरोनाचा संसर्ग वाढत होता. राजकीय आशीर्वाद आणि प्रशासनाच्या दुर्लक्षणामुळे घाबरलेले चाकरमानी गुपचूप जिल्ह्यात दाखल झाले आणि कोरोनाचा फैलाव सुरू झाला. बाधित रुग्णांचा प्रवास मुंबईवरुन आहे. मात्र अजूनही हे सत्र  थांबलेले नाही. आता यापूर्वी खासगी वाहनांनी लोक येत होते. आलेल्या लोकांना क्वारंटाईन केले जात होते. 

गेल्या सात ते आठ दिवसात जिल्ह्यात तब्बल 13 हजार चाकरमानी दाखल झाले आहेत. जिल्हा प्रशासनाकडून दरदिवशी मिळणाऱ्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले. यापूर्वी सव्वा ते दीड लाख चाकरमानी दाखल झाले आहेत. चाकरमानी आले पाहिजेत, मात्र तशी त्यांची व्यवस्था व्हायला हवी. रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आरोग्य यंत्रणा तितकी सक्षम नाही. त्यामुळे संस्थात्मक विलगीकरण किंवा कोविड सेंटरबाबत अनेक तक्रारी येत आहेत. मनुष्यबळ कमी असतानाच कोविड योद्धा डॉक्‍टर, नर्स आदी बाधित होत असल्याने ही समस्या वाढत आहे. जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन सेंटर वाढविण्यापासून खासगी डॉक्‍टरांची मदत घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

हेही वाचा -  रत्नागिरीतील हा तालुका ठरतोय कोरोनाचा हॉटस्पॉट....

जिल्ह्यात क्वारंटाईन केलेले लोक

जिल्ह्यात 1 ऑगस्टला 21 हजार 922 लोकांना क्वारंटाईन केले. 2 ऑगस्टला 24 हजार 439, 3 ऑगस्टला 26 हजार 339, 4 ऑगस्टला 27 हजार 700, 7 ऑगस्टला 33 हजार 41 जण क्वारंटाईन झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यावरून 1 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत 13 हजार चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

संपादन - स्नेहल कदम

loading image