नितेश राणेंना चिखलफेक भोवली; न्यायलयीन कोठडीत रवानगी

नितेश राणेंना चिखलफेक भोवली; न्यायलयीन कोठडीत रवानगी

कणकवली - अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणी अटकेत असलेले आमदार नितेश राणे व त्यांचे 18 कार्यकर्त्यांना आज कणकवली न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी या प्रकरणी न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान जिल्हा सत्र न्यायलयात जामिन मिळवण्यासाठी कार्यकत्यांच्या वकीलांचे प्रय़त्न सुरू आहेत. 

दरम्यान, कणकवली महामार्ग प्राधिकरणचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखलफेक केल्याप्रकरणी अटक आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमानच्या 19 कार्यकर्त्यांना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कणकवली गडनदी पुलावर चार जुलैला आंदोलन झाले होते या दरम्यान श्री शेडेकर यांच्यावर चिखलफेक आणि त्यांना बांधून ठेवण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी आमदार राणे यांच्यासह स्वाभिमानच्या 19 जणांना अटकेची कारवाई केली होती. चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर त्यांना आज येथील न्यायालयात हजर करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com