esakal | चिपूळणातील 15 गाव विभागाचा संपर्क अजूनही तुटलेलाच
sakal

बोलून बातमी शोधा

चिपूळणातील 15 गाव विभागाचा संपर्क अजूनही तुटलेलाच

चिपूळणातील 15 गाव विभागाचा संपर्क अजूनही तुटलेलाच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चिपळूण : तालुक्यातील पंधरा गाव विभागातही महापूर व अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. रस्ते वाहून गेल्याने या भागाचा अजूनही या गावांचा संपर्क तुटलेला आहे. त्याशिवाय कोणतीही शासकीय यंत्रणा या भागात पोहचली नसल्याने ओरड केली जात आहे. महापूर व अतिवृष्टीमुळे चिपळूण पूर्व भागात खासगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या भागातील नद्यांचे पाणी गावागावात शिरल्यामुळे होत्याचे नव्हते झाले. या भागातील अनेक कुटुंब उदध्वस्त झाली असून काही घरांनाही फटका बसला आहे. तसेच मुख्य रस्त्यावरील चार पूल आणि पाच साकव वाहून गेले.

अतिवृष्टिमुळे नांदिवसे स्वयंदेव या ठिकाणी काशिनाथ शिवराम कातुरडे यांच्या घरावर दरड कोसळली. त्यामुळे आजुबाजूच्या अकरा कुटुंबांना धोका निर्माण झाला आहे. बावलाई नांदिवसे येथे घरामधून जमिनीला भेगा पडल्याने तेथील पाच कुटुंबांना तत्काळ ग्रामस्थांनी तात्पुरते स्थलांतरित केले आहे. त्याचबरोबर नांदिवसे, दादर व कळकवणे गावच्या नळपाणी योजनेच्या विहिरी पंप हाऊस आणि पाईपलाईन वाहून गेले आहे. दसपटी पूर्व विभाग आजही अंधारात आहे. यावर शासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

हेही वाचा: ढिगाऱ्‍याखाली अडकलेल्या दोन वर्षाच्या आरुषचा शोध सुरूच

या गावातील दळणवळण मार्गच बंद

नांदिवसे, ओवळी, कळकवणे, तिवरे, आकले, कादवड, इंदापूर, तिवड़ी, रिक्टोली, गाणे, दादर, स्वयंदेव, वालोटी, खडपोली गावांच्या दळणवळणाचा मार्गच बंद झाला आहे. तसेच विद्युत खांबही उन्मळून पडल्याने वीज पुरवठा ही खंडित झाला.

loading image
go to top