esakal | ढिगाऱ्‍याखाली अडकलेल्या दोन वर्षाच्या आरुषचा शोध सुरूच
sakal

बोलून बातमी शोधा

ढिगाऱ्‍याखाली अडकलेल्या दोन वर्षाच्या आरुषचा शोध सुरूच

ढिगाऱ्‍याखाली अडकलेल्या दोन वर्षाच्या आरुषचा शोध सुरूच

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चिपळूण : तालुक्यातील पेढे-कुंभारवडीतील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला असून दोन वर्षाच्या बालकाचा अद्यापही शोध लागलेला नाही. मातीच्या ढिगार्‍याखाली असलेल्या आरुषचा शोध अद्यापही सुरू असून एनडीआरएफची मदत घेण्यात आली आहे. परशुराम घाटात चौपदरीकरणाचे काम करणाऱ्‍या कंत्राटदाराने घाटातील चार ते पाच वहाळाच्या मोऱ्‍या बुजवून त्याचे पाणी एकाच मोरीत सोडल्याने घाटाच्या दरीकडील डोंगर घसरल्याने सहा घरे मातीच्या ढिगाऱ्‍याखाली सापडून होत्याचे नव्हते झाले. खासदार विनायक राऊत, मंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी, माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.

पेढे-कुंभारवडीतील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला असून दोन वर्षाच्या बालकाचा अद्यापही शोध लागलेला नाही. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरु असून परशुराम घाटात काम करणाऱ्‍या कंपनीने हॉटेल ताजपासून खाली येणाऱ्‍या चार ते पाच जुन्या मार्गावरील मोऱ्‍या बुजवल्या. या सर्व मोऱ्‍यांमधील पाणी पेढे-कुंभारवाडीजवळील नाल्यामध्ये सोडण्यात आले आहे. पाच मोऱ्‍यांचे पाणी एकाच मोरीत सोडल्याने पाण्याच्या प्रवाहात गेल्या काही दिवसांत वाढ झाली होती. त्यातच चार दिवसापूर्वी पडलेल्या पावसात मोठ्याप्रमाणात पाणी या साचून डोंगराच्या मातीत मुरले. काही दिवसापूर्वी या भागात एक ट्रक पलटी झाल्याने दरड घसरली होती. या घसरलेल्या दरडीमधून पाणी वाहू लागले होते.

हेही वाचा: सिंधुदुर्गच्या पाऊलखुणा; तोतयाच्या आगमनामुळे उडाला गोंधळ

सहा घरे गाडली; चार व्यक्ती वाहून गेल्या

चार दिवसापूर्वी पहाटे साडेपाच-पावणेसहा वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या मोठ्या झोताबरोबर माती व दरड घसरुन खाली आली. यात मांडवकर कुटुंबीयांची सहा घरे गाडली गेली. यात अर्चना हरिश्चंद्र मांडवकर व त्यांची सून आरोही अविनाश मांडवकर यांचा माती खाली दबून मृत्यू झाला. यात आरोही यांचा मुलगा आरुष हा अद्यापही सापडलेला नाही. माती आणि पाण्याचा वेग एवढा होता की, घराबाहेर आलेल्या तीन, चार व्यक्ती शंभरदीडशे फूट वाहून गेल्या.

ठेकेदारावर कारवाई करा..

अर्चना मांडवकर यांच्या पतीचे वीस दिवसांपूर्वीच निधन झाले होते. वडिलांचे कार्य करुन त्यांचा मुलगा अविनाश घटनेच्या दोन दिवसापूर्वी मुंबईला गेल्याने बचावला. या आपत्तीला जबाबदार असणाऱ्‍या ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी पेढे ग्रामस्थांन केली आहे. मातीच्या ढिगाऱ्‍याखाली असलेल्या आरुषचा शोध अद्यापही सुरु असून एनडीआरएफची मदत घेण्यात येत आहे. या घरांमधील काही व्यक्ती मुंबईला असल्याने जिवीतहानी जास्त झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

हेही वाचा: यंदाही अंगारकीला गणपतीपुळे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय

loading image
go to top