

Heroic Flood Rescue in Raigad: 17 People, Including an Infant, Brought to Safety
esakal
-अमित गवळे
पाली: सुधागड तालुक्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत आमणोली आणि कानसळ या गावांमध्ये अडकलेल्या एकूण 17 नागरिकांची स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि ग्रामस्थांच्या साहाय्याने यशस्वी सुटका करण्यात आली आहे. प्रशासनाच्या वेगवान हालचाली आणि स्थानिक तरुणांच्या धाडसामुळे एक मोठी दुर्घटना टळली असून, सर्वत्र या बचावकार्याचे कौतुक होत आहे.