संख्या काय थांबेना : रत्नागिरीत आणखी 18 रुग्ण पॉझिटिव्ह...  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जून 2020

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 287 वर पोहचली आहे

रत्नागिरी :  जिल्हा रुग्णालयाला आज सकाळी 42 अहवाल प्राप्त झाले. पैकी  18 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 287 वर पोहचलीआहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दाखल झालेले चाकरमानी यांचे अहवाल घेण्यात येत आहेत. त्यात पॉझिटिव्ह रुग्ण अधिक आहेत. आज सकाळपर्यंत आलेल्या 18 पॉझिटिव्ह अहवालामध्ये रत्नागिरी 7,  कळंबणी 8, गुहागर 1,  राजापूर 2 असे आहेत. काल पर्यंत आलेल्या पॉझिटिव अहवालांची संख्या 269 होती. त्यात आज आलेल्या 18 पॉझिटिव अहवालांची भर पडली आहे.

हेही वाचा- कोल्हापुरात आजपासून हे राहणार सुरू अन् हे राहणार बंद... -

दरम्यान काल सायंकाळी उशिरा एका रुग्णाला घरी सोडण्यात आले त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता 100 झाली आहे.यासोबत 32 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोन अहवाल विना निष्कर्ष आहेत.रत्नागिरी येथील 7 पैकी 7 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. इतर सर्व रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.             


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 18 more patients positive in Ratnagiri

टॅग्स
टॉपिकस