कोल्हापुरात आजपासून हे राहणार सुरू अन् हे राहणार बंद...

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 1 जून 2020

जिल्हाधिकारी दौलत देसाई : शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था बंदच ..

कोल्हापूर : राज्य शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी जाहीर केलेल्या रोगप्रतिबंधक कायद्यांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात केशकर्तनालये, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर्स, शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण, शिकवणी, शॉपिंग मॉल बंद राहतील. तर 50 टक्के प्रवासी क्षमतेसह जिल्हांतर्गत बससेवा, सशर्त रिक्षा, दुचाकी, चारचाकी वाहने सुरू ठेवली जातील, अशा सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिल्या. ज्या गोष्टी प्रतिबंधित करण्यात आल्या आहेत, त्या सुरू केल्यास किंवा ज्या सुरू होतील पण नियम, अटी पाळल्या जाणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेशही श्री. देसाई यांनी दिले आहेत. 

* कोल्हापूरमध्ये हे बंद राहणार : 
- एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास बंदी 
- शाळा, कॉलेज, प्रशिक्षण, शिकवणी केंद्र 
- आंतरराष्ट्रीय विमानसेवा 
- केशकर्तनालय, सलून, ब्यूटी पार्लर 
- हॉटेल, रेस्टॉरंट 
- सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक संस्था 
- धार्मिक, मनोरंजन कार्यक्रम 
- कोणत्याही सामुदायिक कार्यक्रमांना परवानगी नाही 
- चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, बार आणि सभागृहे 

हेही वाचा- साडेपाच हजार विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी -
.... 

* कोल्हापूरमध्ये हे सुरू राहणार : 
- जिल्हांतर्गत बससेवा 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी 
- सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू 
- मैदाने सुरू (सुरक्षित अंतर ठेवून व्यायाम) 
- सकाळी व्यायाम करता येणार
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kolhapur it will be on and off from today