दापोलीजवळ दोन दुचाकींची धडक; महिलेसह दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 डिसेंबर 2016

दाभोळ ः दापोली-बुरोंडी मार्गावरील चंद्रनगर फाट्याजवळ काल (ता. 2) सायंकाळी सातच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये झालेल्या अपघातात एकाच दुचाकीवरील महिला व पुरुष ठार झाले.

या बाबत दापोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः बुरोंडीकडून क्रूझरवरून (एमएच 08 आर 553) प्रसाद प्रमोद बागकर दापोलीकडे येत होते. त्याचवेळी बुरोंडी-दापोली मार्गावरील चंद्रनगर फाटा येथे त्याच्या उजव्या बाजूला दापोलीकडून बुरोंडीकडे जाणारी मोटारसायकल (एमएच 11 एएच 7342) आदळली.

अपघातात दुचाकीचालक अभिजित सहदेव पवार व वत्सला विष्णू चव्हाण गंभीर जखमी झाले. दोघांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वत्सला चव्हाण यांचा मृत्यू झाला, तर अभिजित पवार यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांचाही मृत्यू झाला. दोघेही मूळचे सातारा येथील आहेत. ते बुरोंडी येथे नातेवाइकांकडे आले होते. प्रसाद बागकर यांनी दापोली पोलिसांना अपघाताची वर्दी दिली. सहायक पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बांगर तपास करीत आहेत.

Web Title: 2 die in accident in dapoli