तारकर्ली समुद्रात दोन पर्यटक बुडाले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

सिंधुदुर्ग : सांगलीतील दोघेजण तारकर्ली समुद्रात बुडाल्याची घटना समोर आली आहे. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह सापडला आहे, तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे.

निखिल पाटील या तरुणाचा मृतदेह सापडला असून स्वप्निल मोहिते या तरुणाचा शोध सुरु आहे. निखिल व्यवसायाने शिक्षक असून, स्वप्नील इंजिनीअर असल्याची माहिती आहे.

एकूण आठजण फिरायला आले होते. त्यापैकी दोघेजण बुडाले. सर्व जण सांगलीतील तासगावजवळच्या मांजर्डीमधले रहिवासी आहेत.
 
Web Title: 2 drowned at tarkarli beach