कणकवलीजवळ अपघातात 2 ठार, पाच जखमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 सप्टेंबर 2016

कणकवली - मुंबई -गोवा महामार्गावर कासार्डे (ता.कणकवली) येथे भरधाव येणाऱ्या कंटेनरला बाजू देताना खाजगी ओमनी मोटारीची धडक बसल्याने फणसगाव (ता.देवगड) येथील दोघे जण जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास झाला. 

या अपघातात चंद्रकांत महादेव मोरे आणि प्रकाश सदाशिव गोवळकर (दोन्ही रा. फणसगाव) यांचा मृत्यू झाला आहे. तर गणेश विनायक गोवळकर, मंगेश रघुनाथ मोरे, सुहास बाबू वाघ, विनायक बाबू गोवळकर, शंकर धोंडू गोवळकर हे जखमी झाले आहेत. फणसगांव पंचक्रोशीत रूग्णवाहिका नसल्याने मंगळवारी रात्री अचानक अस्वस्थता जाणवत असलेल्या एका खाजगी ओमनी मोटारीतून प्रकाश गोवळकर (वय 60) यांना उपचारासाठी प्रथम कासार्डे तेथून कणकवलीत उपचारासाठी दाखल करण्यासाठी आणत असताना हा अपघात झाला. अपघातात प्रकाश यांच्यासह ओमनी चालक चंद्रकांत मोरे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कंटेनर चालक खलीक अली खान (रा. युपीरा, ता. रतीपूर, जि. फैजाबाद, उत्तरप्रदेश) याला पोलिसांनी अटक केली आहे. 

Web Title: 2 killed in road accident near kankavli, five injured