आता शेतकऱ्यांना होणार लाभ ; २०० रूपयांचे बियाणे मिळणार केवळ ५० रूपयात

200 rupees seeds are available only in 50 rupees in ratnagiri the activity of zilla parishad cess fund
200 rupees seeds are available only in 50 rupees in ratnagiri the activity of zilla parishad cess fund

चिपळूण (रत्नागिरी) : जिल्हा परिषद सेस फंडातून विविध ९ प्रकारच्या बियाणांचे किट ७५ टक्के अनुदानावर पंचायत समितीत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेले आहे. २०० रूपयांचे  हे बियाणे शेतकऱ्यांना केवळ ५० रूपयात मिळणार आहे. शेतकऱ्यांनी पुढील तीन चार महिन्याच्या कालावधीत भाजीपाला उत्पादन घेऊन चांगले अर्थाजन करावे. असे आवाहन सभापती धनश्री शिंदे यांनी पंचायत समितीमधील कार्यक्रमात केले.

जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने ७५ टक्के अनुदानावर विविध प्रकारचे भाजीपाला बियाणे उपलब्ध करून दिलेले आहे. यामध्ये भेंडी, भोपळा, मुळा, शिराळी, वांगी, मिरची, पालक, चवळी, घेवडा, आदी बियाणे आहेत. पंचायत समितीमधील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बचत गटाच्या महिलांना या बियाणांचे वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना सभापती धनश्री शिंदे म्हणाल्या, शेतकऱ्यांना एकाचवेळी ९ प्रकारचे बियाणे केवळ ५० रूपयात मिळणार आहे.

बचत गटाच्या महिला असो वा शेतकऱ्यांनी आपल्या परस बागेत, शेतात. या बियाणांची लागवड करावी. यातून कुटुबाला पाहिजे तेवढा भाजीपाला मिळेल. शिवाय उर्वरित भाजीपाल्याची वाडीत-गावात विक्री करून कुटुंबाच्या उन्नत्तीसाठी हातभार लावता येईल. पाच-दहा गुठ्यांत उन्हाळी भाजीपाला केल्यास शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन मिळण्यास मदत होईल. यासाठी शेतकऱ्यांनी व्यावसायिक शेतीची कास धरणे आवश्‍यक असल्याचे सांगितले.

उपसभापती पांडुरंग माळी यांनी महिलांनी भाजीपाला लागवड मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहन केले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भाजीपाला लागवडीबाबत योग्य मार्गदर्शन केले. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत, सदस्य शरद शिगवण, बाबूशेठ साळवी, कृषी अधिकारी जानवलकर, कृषीचे सर्व विस्तार अधिकारी, उमेदचे तालुका प्रभाग समन्वयक व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com