कोकणात पक्ष्यांच्या संख्येमध्ये का होतीये घट

300 bird species in konkan sindhudurg but cutting of trees this destroyed from konkan
300 bird species in konkan sindhudurg but cutting of trees this destroyed from konkan

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी ३०० पेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी आढळून येतात. पक्षी वैभव सिंधुदुर्गच्या पर्यावरण व पर्यटन विकासासाठी फारच महत्त्वाचे आहे; मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी बेसुमार वृक्षतोड आणि मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण होत आहे, असे प्रा. डॉ. गणेश मर्गज यांनी म्हटले आहे.

वन्यजीव सप्ताहानिमित्त वाईल्ड कोकण सावंतवाडी आयोजित ऑनलाईन वेबीनारमध्ये सिंधुदुर्गातील पक्षी विविधता विषयावर डॉ. मर्गज यांनी मांडणी केली. ते म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्ह्याला समृद्ध पश्‍चिम घाट व समुद्र किनारा लाभला आहे. या समृद्ध वारसामुळे सह्याद्री कडेकपारीत, जंगल, खारफुटी, समुद्र किनारा, नद्या, तलाव, पाणथळ, मिठागरे दलदल, पाणवठे अशा विविध भागांमध्ये ३०० पेक्षा जास्त पक्षी आढळून येतात. या पक्षी वैभवामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरणाचे देखील रक्षण होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्ष्यांचा अधिवासात वेगळेपणा जाणवतो. पर्यावरणात पक्षांना फारच महत्त्व आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.’’

ते म्हणाले, ‘‘बेसुमार वृक्षतोड व मानवी हस्तक्षेपामुळे पक्ष्यांचा अधिवास नष्ट होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पक्ष्यांची अन्नसाखळी आणि अधिवासमधील वैशिष्टपूर्णता पाहता सिंधुदुर्गात जैवविविधता व पर्यावरणाचे रक्षण व्हायला हवे. आज गिधाडे दुर्मिळ झाली आहेत.’’ या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाईल्ड कोकणचे अध्यक्ष प्रा. धीरेंद्र होळीकर यांनी केले. यावेळी प्रा. सुभाष गोवेकर, डॉ. किशोर सुखटणकर, सतीश लळीत, शिवप्रसाद देसाई, अभिमन्यू लोंढे, अर्जुन सावंत, वीरश्री रावराणे जामदार, अनुश्री परब, नंदन बिरोडकर, महेंद्र पटेकर, काका भिसे, डॉ. श्रीप्रसाद केरकर, ललिता भट, शिरीष म्हात्रे, सुभाष पुराणिक, जगन्नाथ राऊळ, विद्येश सापळे, डॉ. बाळकृष्ण गावडे, डॉ. मानसी चोरगे, संजू पै, सुहास कुर्ले आदींनी वेबिनारमध्ये सहभाग घेतला होता.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com