

लातूर, बेळगाव, सोलापूर, कोल्हापूर मार्गावरील फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
कणकवली : मुंबई तसेच राज्याच्या इतर भागांत महिला (Women) सन्मान मेळावे होत आहेत. त्यासाठी सिंधुदुर्ग विभागातील १०० एस.टी. पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील दिवसाच्या ३०० पेक्षा जास्त फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्याचा मोठा फटका प्रवाशांना (Passenger) बसत असून, ग्रामीण भागातील प्रवाशांना गावी जाण्यासाठी तीन ते चार तास ताटकळत राहावे लागत आहे.
महिला महामेळाव्यासाठी सिंधुदुर्ग (Sindhudurg) विभागातील ७९ उरणला, तर खालापूर येथे २१ बसगाड्या पाठविण्यात आल्या आहेत. कणकवली तालुक्यातील ३४, सावंतवाडीतील ३६, मालवण ५८, देवगड ८६, विजयदुर्ग ३७, कुडाळ ४२ आणि वेंगुर्ला आगारातील ७३ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. फेऱ्या रद्द झाल्याची माहिती प्रत्येक स्थानकात नोटिस फलकावर लावलेली आहे.
सिंधुदुर्ग विभागाने दिलेल्या माहितीनुसार ११ ते १४ जानेवारीदरम्यान सुमारे ३०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. १५ जानेवारीपासून सर्व फेऱ्या पूवर्वत होणार आहेत; मात्र अनेक फेऱ्या रद्द झाल्याचा मोठा फटका ग्रामीण प्रवाशांना बसला आहे. लातूर, बेळगाव, सोलापूर, कोल्हापूर मार्गावरील फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. कणकवली बसस्थानकातून (Kankavli Bus Stand) कोल्हापूरला जाण्यासाठी, तर सकाळी सहा ते साडेआठपर्यंत एकही बस नाही. तशी सूचनाही फलकावर आहे.
जिल्ह्यातील प्रमुख मार्गावर सहा आसनी रिक्षा आणि इतर खासगी वाहने असल्याने प्रवाशांची काही प्रमाणात गैरसोय टळली; मात्र अनेक गावांमध्ये सहा आसनी रिक्षा व इतर वाहने उपलब्ध नाहीत. तेथे प्रवाशांना दोन ते चार तास बसस्थानकात ताटकळत राहावे लागत आहे. सिंधुदुर्गातून रद्द झालेल्या प्रमुख फेऱ्यांमध्ये लातूर, पंढरपूर, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सावंतवाडी यांचा समावेश आहे. जिल्हाअंतर्गत देवगड, वेंगुर्ला, मालवण व काही ग्रामीण भागातील बस फेऱ्यादेखील रद्द करण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.