National Sports Competition : 37 व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी; 17 पदकांवर उमटवली मोहोर

कँपाल पणजी, गोवा येथे सुरू असलेल्या 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
National Sports Competition : 37 व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी; 17 पदकांवर उमटवली मोहोर

पाली - कँपाल पणजी, गोवा येथे सुरू असलेल्या 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 7 सुवर्ण 5 रौप्य 5 कांस्य पदकाची कमाई करत पिंच्याक सिलाट खेळात महाराष्ट्राचे अवल स्थान अबाधित ठेवले आहे. या स्पर्धेत रायगडच्या सुधागड पालीतील अनुज सरनाईकने चमकदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले.

या स्पर्धेमध्ये एकूण २८ राज्यामधील ३१४ खेळाडूंची निवड झाली होती. त्यामध्ये महाराष्ट्र संघामध्ये एकूण २० खेळाडूंची निवड झाली होती. या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ गोवीद गावडे क्रीडा मंत्री गोवा, शहदेव यादव खजिनदार इंडियन ओलंपिक असोसिएशन, अमिताभ शर्मा चेयरमैन G T C GOA, योगेश्वर दत्त ऑलिम्पिक मेडलिस्ट, इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले, स्पर्धेचे डायरेक्टर मोहम्मद इक्बाल, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्या हस्ते झाला.

या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक किशोर येवले यांचे मार्गदर्शन लाभले. संघ व्यवस्थापक म्हणून साहेबराव ओहोळ, वरिष्ठ संघ प्रशिक्षक म्हणून सुहास पाटील व कनिष्ठ संघ प्रशिक्षक म्हणून अभिषेक आव्हाड, स्वश्वेतम बुग्गावार, अक्षय कळसेकर यांनी आपल्या संघाची धुरा सांभाळली.

तुंगल इव्हेंट सुवर्ण पदक (पुरुष)

1) कृष्णा नरसिह पांचाळ तुंगल इव्हेंट (पुरुष)

तुंगल इव्हेंट (महिला) रौप्य पदक

1) किर्णाक्षी किशोर येवले

रेग्यु इव्हेंट सुवर्ण पदक(पुरुष)

1) ओंकार गणेश अभंग

2) वैभव वाल्मिक काळे

3) अंशुल अरुण कांबळे

गंडा इव्हेंट पुरुष - कांस्य पदक(पुरुष)

1) सचिन गर्जे

2) कार्तिक पालवे

सोलो इव्हेंट कांस्य पदक(पुरुष)

1) वैभव काळे

सोलो इव्हेंट कांस्य पदक (महिला)

1) पूर्वी राहुल गांजवे

फाईट इव्हेंट सुवर्ण पदक (पुरुष)

1) धनंजय आनंदा सांदगुडे(-45kg)

2) रामचंद्र दीपक बदक(45ते 50kg)

3) कार्तिक शिवाजी पालवे (50ते 55kg)

4) वैभव वाल्मीक काळे (60 ते 65)

फाईट इव्हेंट सुवर्ण पदक (महिला)

1) भक्ती शिवाजी कीलेदर (ओपन 1)

फाईट इव्हेंट रौप्य पदक (पुरुष)

1) सोमनाथ सहदेव सोनावणे(55 ते 60)

2) ओंकार गणेश अभंग(70 ते 75)

3) अनुज दत्तगुरु सरनाईक (85 ते 90)

फाईट इव्हेंट रौप्य पदक (महिला)

1) किर्णाक्षी किशोर येवले(60 ते 65)

फाईट इव्हेंट कांस्य पदक (महिला)

1) जयश्री कैलास शेट्टे (50 ते 55kg)

फाईट इव्हेंट कांस्य पदक (पुरुष)

1) पीयूष अभय शुक्ला (90 ते 95)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com