esakal | राजापूरवासियांची चिंता वाढली: चौपदरीकरणाचे काम करणारे 38 जण बाधित!

बोलून बातमी शोधा

राजापूरवासियांची चिंता वाढली: चौपदरीकरणाचे काम करणारे 38 जण बाधित!
राजापूरवासियांची चिंता वाढली: चौपदरीकरणाचे काम करणारे 38 जण बाधित!
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तालुक्‍यामध्ये उद्रेक होत असून गेल्या चोवीस तासामध्ये तब्बल शंभरहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील ऍक्‍टीव्ह रुग्णांची संख्या 270 झाली आहे. गेल्या चोवीस तासामध्ये सापडलेल्या रुग्णांमध्ये चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या 38 लोकांचा समावेश आहे. त्यांना होम आयसोलशनमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

गेल्या चोवीस तासामध्ये तालुक्‍यात तब्बल 103 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे तालुक्‍यातील रुग्ण संख्या वाढली आहे. आरोग्य विभाग, नगरपालिका प्रशासन यांच्यासह अन्य प्रशासकीय विभागांकडून कोरोनाला रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तालुक्‍यामध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याने राजापूरवासियांची चिंता वाढविणारी आहे.

हेही वाचा- ..तर अनेकांचे जीव वाचले असते; नीलेश राणेंचे अनिल परबांवर टीकास्त्र

राजापूर तालुक्‍यामध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामध्ये मोठ्यासंख्येने कामगार कार्यरत आहेत. त्यापैकी 340 जणांची ऍण्टीजेन टेस्ट घेण्यात आली आहे. त्यापैकी 38 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

दृष्टीक्षेप

एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- 765

बरे झालेले रुग्ण- 465

मृत - 30

ऍक्‍टीव्ह रुग्ण- 270

Edited By- Archana Banage