रत्नागिरी जिल्ह्यात ४१ ठिकाणचे पाणीस्रोत दूषित

रत्नागिरी जिल्ह्यात ४१ ठिकाणचे पाणीस्रोत दूषित

रत्नागिरी - जिल्हा परिषदेतील जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत दर महिन्याला पाण्याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाते. ऑक्‍टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या तपासणीत जिल्ह्यात ४१ ठिकाणचे पाणी स्रोत दूषित आढळले.

पावसाळ्यात अनेक ठिकाणचे पाण्याचे स्रोत दूषित आढळले होते. पावसाळा संपल्यानंतर मात्र यात घट झाली. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात दूषित पाण्याचे प्रमाण कमलीचे घटले होते. परंतु ऑक्‍टोबर महिन्यात मात्र पुन्हा दूषित पाण्याच्या स्रोतात वाढ झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यात पावसाळापूर्व घेण्यात आलेल्या तपासणीत ३७२० नमुन्यांपैकी १०६ ठिकाणचे पाणी नमुने दूषित आढळले होते.

ऑगस्टमध्ये ३५ नमुने दूषित, तर सप्टेंबरमध्ये २२ नमुने दूषित आढळले होते. मंडणगड तालुक्‍यात ४०८, दापोलीत ८७५, खेड १००३, गुहागर ७७३, चिपळूण १२३९, संगमेश्‍वर ९७३, रत्नागिरी ७५६ लांजा ७०६ आणि राजापूर तालुक्‍यात १०५५ असे जिल्ह्यात ७ हजार ७८८ पाण्याचे स्त्रोत आहेत.  यातील काही पाण्याचे नमुने दर महिन्याला प्रयोग शाळेत तपासले जातात. दूषित पाणी पिल्याने आजारांना सामोरे जावे लागते. जुलाब, उलटी, टायफॉइड, गॅस्ट्रो, विषाणू, जिवाणूंचे आजार, जंतूची वाढ यांसारखे आजार होतात. जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावतात. जलजन्य आजारांमुळे गावांमध्ये साथ सुरू होण्याची भीतीदेखील असते. प्रशासनाने हा धोका ओळखून वेळीच पावले उचलली आहेत. 

तालुकानिहाय आकडे...
ऑक्‍टोबर महिन्यात मंडणगड तालुक्‍यात तपासणीसाठी प्राप्त झालेल्या १०१ नमुन्यांपैकी २, दापोलीत २२५ नमुन्यांपैकी ७, खेडमध्ये २५७ नमुन्यांपैकी ८, गुहागरमध्ये २५३ पैकी ६, चिपळूणमध्ये ३६५ पैकी १३, संगमेश्‍वरमध्ये २७६ पैकी १, रत्नागिरीतील १८६ पैकी ०, लांजातील १७६ पैकी १, तर राजापूर तालुक्‍यातील २३८ पैकी ३ पाणी नमुने दूषित आढळले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com