प्रदर्शनात आंब्याच्या 43 जातींची हजेरी 

प्रदर्शनात आंब्याच्या 43 जातींची हजेरी 

दापोली - आंबा लागवड करतानाही किती वैविध्यपूर्ण रितीने करता येते, याचा नमुनाच आज येथे कृषी विद्यापीठाने सादर केला. एकसुरी लागवडीऐवजी कोणत्याही जातीच्या आंब्याची लागवड करताना त्यात 10 टक्के झाडे ही वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याची लावावीत, असा सल्ला विद्यापीठाकडून देण्यात येतो. अशा लागवडीसाठी उपयुक्त विविध 43 प्रजातींचे आंबे प्रदर्शनात मांडले होते. हे प्रदर्शन सर्वाधिक लक्षवेधी ठरले. 

येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात आयोजित आंबा महोत्सवात कोकणातील वातावरणात व्यापारी दृष्टीने चांगले उत्पादन देणाऱ्या आणि उत्पादन वाढीसाठी त्याच्याबरोबर 10 टक्के लावणे आवश्‍यक असणाऱ्या विविध प्रकारच्या 43 प्रजाती पाहायला मिळाल्या. कोर्टिन जातीचे आंब्याचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 

या प्रदर्शनाचे उद्‌घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनात कोकणात वाढणाऱ्या 150 विविध प्रकारच्या देशी आणि परदेशी आंब्यांच्या प्रजातीपैकी हापूस, रत्ना, सिंधू, केशर, पायरी, कोकणराजा, कोकणरुची, गोवामाणकुर, तोतापुरी, हत्तीझुल, बैंगनपल्ली, बाटली, वनराज, हायब्रीड 237, छोटा जहांगीर, आम्लेट, आयआय एचआर-13, चित्तूर बदामी, बदामी गोल, परमाल गोवा, काळी हापूस दहानु, मोहन भोग, मोहन भोग, इ एस स्पेशल, वातगंगा, पुलिहारा, कोंडुर गोवा, गधेमार, आलमपूर बाणेशान, रुमानी, पदेरी, केंसिंगटन, टॉमी अटकिन्स, ब्लॅक कोलंबन, विलाय कोलंबन, करूठा कोलंबन, एम-13-3, इस्राईल हायब्रीड, ऑस्टीन, माया, कोर्टिन आणि पामर या आंब्यांची फळे मांडण्यात आली होती. 

प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या कोर्टिन जातीचे आंब्याचे झाड सर्वांचे लक्ष वेधले. मोठ्या कुंडीत लागवड करता येईल अशी ही आंब्याची जात आहे. ते चार ते पाच फूट उंच वाढते आणि तेवढ्याच वृक्षाला आंबे लगडतात. कमी जागेत उत्पादन घेण्यासाठी या जातीचा उपयोग होतो. पायरी, रत्ना यासारख्या लवकर उत्पादन देणाऱ्या आणि रस काढण्यासाठी उपयुक्त असलेल्या आंब्याची मांडणी करण्यात आली होती. आंबा लोणच्याची प्रसिद्ध असलेली कोकण रुची, मॅंगो सॅलड म्हणून उपयोगात आणला जाणारा कोकणराजा आणि हापूस आंब्याच्या चवीशी साधर्म्य असलेला कोकणसम्राट या जातीचे आंबे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. 

या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, आमदार संजय कदम, संजय केळकर, राजन साळवी, माजी न्यायमूर्ती जे. नारायण पटेल, कुलसचिव जयराम देशपांडे, डॉ. संजय भावे, डॉ. बी. आर. साळवी, डॉ. प्रमोद सावंत, डॉ. सतीश नारखेडे, महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com