सुधागड तालुक्यात वादळी पावसामुळे 45 घरांचे नुकसान

अमित गवळे 
मंगळवार, 5 जून 2018

पाली पाली : सुधागड तालुक्यात सोमवारी (ता.४) वळवाच्या वादळी मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाली. येथील भावशेत, आदिवासीवाडी,  ठाकूरवाडी, तसेच नाडसूर, घोडपापड आदिवासीवाडीतील घरांचे खुप नुकसान झाले. अनेक ठिकाणी विजेचे खांब व तारा कोसळून पालीसह आजुबाजुच्या गावांतील विजपुरवठा पाच तास खंडीत झाला होता. या पावामुळे दोन महिला देखिल जखमी झाल्या. 

सोसाट्याचा वारा व पावसामुळे घरांवरील सिमेंटचे पत्रे, पाईप उडाले. एका घरावरुन दुसर्‍या घरावर देखील उडून पडले. तसेच अनेक घरांच्या भिंती कोसळल्या. जोरदार पाउस पडत असल्याने नागरीकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने मोठी जिवीतहाणी टळली. असे आपटवणे येथील ग्रामस्त कैलास दंत यांनी सांगितले. या नैसर्गीक आपत्तीत 45 पेक्षा अधिक घरांचे नुकसान झाले असून पत्रे, भिंती व कौले तुटून पडल्याने घरातील महागडी विद्युत उपकरणात बिघाड झाला आहे. घरांचे छप्पर उडाल्याने घरातील साहित्य, धान्य भिजून अनेकांचे मोठे नुकसान झाले. अंदाजे १० लाखांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

महसूल प्रशासनाने या नुकसानीची तातडीने पंचनामे करुन शासनाने त्वरीत नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्तांनी केली आहे. यावेळी जि.प सदस्य सुरेश खैरे, पंचायत समिती सभापती साक्षी दिघे तसेच पुरोगामी युवक संघटनेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अरिफ मनियार, सखाराम दिघे, शरद चोरगे आदीनी घटनास्थळी जावून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन ग्रामस्तांची विचारपूस केली.

सुधागड तालुक्यातील भावशेत, भावशेत आदिवासीवाडी, भावशेत ठाकूरवाडी, तसेच नाडसूर आदि गावात वादळीवार्‍यासह पावसाने झालेल्या घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनस्तरावर सुरु करण्यात आले आहे. नुकसानग्रस्तांनी शासनाकडून नुकसान भरपाई मिळण्याबाबत मागणी केली असून त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही केली जाईल. 

Web Title: 45 houses damage due to windy rain in Sudhagad taluka