भोगवे, चिवला किनाऱ्यासाठी ५ कोटी मंजूर - विनायक राऊत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 मे 2017

वेंगुर्ले - समुद्रकिनाऱ्याच्या शोधात असलेल्या पर्यटकांना भोगवे हा किनारा नक्कीच आकर्षण ठरणारा असून यासाठी स्वदेश दर्शन या योजनेतून भोगवे व चिवला किनारा यांना प्रत्येकी ५ कोटी मंजूर झाले  आहेत. हा निधी लवकरात लवकर खर्च करून आवश्‍यक सोयी-सुविधा देण्याचे काम सुरू असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी काल (ता. १) भोगवे येथे सांगितले.

केंद्र शासनाच्या स्वदेश दर्शन योजनेतून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतर्फे पर्यटकांसाठी ‘कंटेनर टॉयलेट’ योजनेचा लोकार्पण सोहळा खासदार राऊत यांच्या उपस्थितीत भोगवे किनारा येथे झाला. 

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बागल, जिल्हा परिषद सदस्य सुनील म्हापणकर, पंचायत समिती सदस्य प्रणाली बंगे, गटविकास अधिकारी माधुरी परीट, सरपंच सुनील राऊत, जिल्हा परिषद शिवसेना गटनेते राजेंद्र परब, नगरसेवक संदेश निकम, माजी सरपंच महेश सामंत, उपसरपंच चेतन सामंत, सचिन देसाई, सोमा घाडीगावकर उपस्थित होते. 

या वेळी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून व ७ लाख रुपये खर्च घालून उभारलेल्या कंटेनर बाय टॉयलेटचे  खासदार राऊत यांनी उद्‌घाटन केले. तर महिला  स्वच्छता गृहाचे लाकार्पण पंचायत समिती सदस्य बंगे यांच्या हस्ते झाले. 

खासदार राऊत म्हणाले, ‘‘भोगवे ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांनी या सेवेचा दीर्घकालीन  कसा उपयोग करून घेता येईल याकडे लक्ष द्यावे व  याची व्यवस्थित निगा राखावी. तसेच याठिकाणी अजून पर्यटन वृद्धी व्हावी यासाठी मालवण प्रमाणे कॉटेजची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न व्हावेत.’’

Web Title: 5 crore sanction for bhogave, chivala beach