चिपळूण-गुहागर बायपाससाठी ५ कोटी मंजूर

राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीवरून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने हात झटकले होते
5 crore sanctioned for Chiplun Guhagar bypass
5 crore sanctioned for Chiplun Guhagar bypassEsakal

चिपळूण : चिपळूण-गुहागर बायपास रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५  कोटी रुपये मंजूर झाले आहेत, असे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने आमदार भास्कर जाधव यांना पाठवले आहे. त्यामुळे जाधव यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीवरून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाने हात झटकले होते. मात्र, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी विशेष लक्ष देऊन या रस्त्यासाठी निधी मंजूर करून घेतला.

चिपळूण आणि गुहागरला जोडणाऱ्या बायपास रस्त्याची अत्यंत दुर्दशा झाली आहे. मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावरून वाहन चालविणेच नाही तर चालणेदेखील मुश्कील झाले आहे. आधी राज्यमार्ग असलेला हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाला. परंतु कागदोपत्री ही प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू होण्यास विलंब लागणार असल्याचे समजल्यानंतर भास्कर जाधव राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चिपळूण येथे बैठक घेतली. हा आता रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे वर्ग झाल्याने तो त्यांनी करायला हवा, असे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. रस्ता वर्ग होण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असून ती पूर्ण होण्यास अजून काही कालावधी जावू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत रस्ता दुरूस्तीसाठी खर्च टाकता येणार नाही, अशी भूमिका राष्ट्रीय महामार्ग विभागाची होती. रस्त्यावर खर्च कोणी करायचा, हाच मोठा प्रश्न होता. आमदार जाधव यांनी दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून मंत्रालयीन सचिवांपर्यंत संपर्क साधला.

त्यांना रस्त्याच्या गंभीर स्थितीची जाणीव करून दिली. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून हे काम करून घ्यायचे झाले तर त्यास खूप कालावधी जाईल, हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून दिले. आणि अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता दुरूस्तीसाठी पैसे उपलब्ध करून दयावेत, असा निर्णय त्यांनी करून घेतला. त्यानंतर तत्काळ ५ कोटींची रक्कम मंजूर करून घेण्यासही त्यांना यश आले आहे. तसे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

चिपळुणात येण्यासाठी जाधव यांची नौटंकी

चिपळूण गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना चिपळूणचे वेध लागले आहेत. चिपळुणात येण्यासाठी त्यांची नौटंकी सुरू आहे. ग्रामस्थांची ते दिशाभूल करीत आहेत, असा आरोप भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष मालप यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला. भास्कर जाधव यांनी गुहागर बायपास रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करून तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याचे जाहीर केले होते. गुहागर बायपास रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातच नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com