esakal | ब्रेकिंग : रत्नागिरीत नव्या 53 रुग्णांची भर..
sakal

बोलून बातमी शोधा

ब्रेकिंग : रत्नागिरीत नव्या 53 रुग्णांची भर..

दोन व्यक्तींचा मृत्यू, जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 565 झाली आहे.

ब्रेकिंग : रत्नागिरीत नव्या 53 रुग्णांची भर..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : सोमवारी चोविस तासात जिल्ह्यात 53 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 565 झाली आहे. मुंबईकर चाकरमानी जिल्ह्यात दाखल होऊ लागल्यामुळे हा आकडा वाढला असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामूळे जिल्ह्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1,932 इतकी झाली आहे. 

सोमवारी नव्याने सापडलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये रत्नागिरी 20, कामथे 28, कळंबणी 13, लांजा 1, अ‍ॅन्टीजेन टेस्ट 2, गुहागर 1, दापोलीतील 2 जणांचा समावेश आहे. आज दिवसभरात पाच रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1304 झाली आहे. घरी परतलेल्यांमध्ये कोव्हीड रुग्णालयातील 4, समाजकल्याण मधील एका रुग्णाचा समावेश आहे.

हेही वाचा - कोरोनाने घाबरवले पण कोंबडीने सावरले... 

तालुक्यात नव्याने सापडलेल्या 11 नवीन रुग्णांमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणारी नर्स, सलून चालक यांचा समावेश आहे. तर दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील 70 वर्षीय महिलेचा रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच चिपळूणमधील सती येथील 58 वर्षीय रुग्णाचा रत्नागिरी येथील कोव्हीड रुग्णालय आणत असतानाच मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता 63 झाली आहे. 426 नमुने रत्नागिरी येथील प्रयोगशाळेत आणि घरडा केमिकल्सच्या खाजगी लॅबमधील नमुने प्रलंबित आहेत.

हेही वाचा - आता फक्त आस प्रभू श्रीरामाच्या दर्शनाची!

सध्या अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 565 झाली. आणि 254 अ‍ॅक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन आहेत. जिल्ह्यातील होम क्वॉरंटाईनची संख्या वाढली आहे. 1 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील होम क्वारंटाईन असलेल्या लोकांची संख्या 21 हजार 700 होती. दोन दिवसात त्यामध्ये 2700 लोकांची भर पडली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईकर चाकरमानी कोकणात दाखल होऊ लागले. त्यासाठी कशेडी येथे तपासणी नाका उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी प्रवाशांचा पास तपासणी करुन त्याची नोंद केली जाते. आणि पुढील प्रवासासाठी पाठविण्यात येते. 

संपादन - स्नेहल कदम 

loading image