चौदा हजार बागायतदारांना 55 कोटी लाभांश

राजेश कळंबटे
सोमवार, 10 डिसेंबर 2018

रत्नागिरी - उच्च तापमान आणि अवकाळी पावसामुळे गतवर्षी पिडीत झालेल्या आंबा बागायतदारांना विमा लाभांशाचा दिलासा ऐन हंगामाच्या तोंडावर मिळू लागला आहे. जिल्ह्यातील 14 हजार 278 बागायतदारांना 55 कोटी रुपयांचा लाभांश बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. साडेसात कोटीच्या तुलनेत सहा पट लाभांश मिळाल्याचे इफ्कोट टोकीयो कंपनीकडून करण्यात आला आहे. हंगामाच्या तोंडावर हा लाभ मिळत असल्याने बागायतदार समाधानी आहेत.

हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत आंबा, काजूचा 2013 मध्ये समावेश केला. त्यानंतर दोन वर्षे त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता; मात्र 2016-17 पासून शेतकर्‍यांची संख्या वाढत गेली. 2017-18 या वर्षात जिल्ह्यातील 14,278 बागायतदारांनी 13 हजार 673.11 हेक्टर क्षेत्रावरील आंबा, काजूचा विमा उतरवला होता. त्यापोटी 7 कोटी 58 लाख 62 हजार 884 रुपये प्रिमअम भरला होता.

इफ्को टोकियो कंपनीमार्फत ही प्रक्रिया सुरु होती. राज्य शासनाने ऑक्टोबरमध्ये आपल्या हिस्स्याचा हप्ता भरला; मात्र केंद्र शासनाचा समभाग भरावयाचा होता. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दोनच दिवसांपुर्वी कंपनीने बागायतदारांच्या खात्यात रक्कम जमा करण्यास सुरुवात केली आहे. त्याची बँकनिहाय यादी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयाकडे प्रदान केली आहे.

कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील 1,289 काजू बागायतदारांना 3 कोटी 45 लाख 48 हजार 158 रुपये लाभ मिळाला आहे. तसेच 13,167 आंबा बागायतदारांना 51 कोटी 67 लाख 15 हजार 546 रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. शेतकर्‍यांनी भरलेल्या प्रिमिअमच्या सहा पट रक्कम देण्यात आली आहे. आतापर्यंत जास्तीत जास्त बारा कोटी रुपयांचा लाभांश बागायतदारांना मिळाला होता यावर्षी त्या घसघशीत वाढ झाली आहे.

विमा लाभांश मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. कृषी विभागाकडे लाभांश न मिळाल्याची तक्रार केली होती. त्यात केंद्राचा हप्ता न भरल्याचे कारण पूढे आले. गेल्या काही दिवसात यावर निर्णय घेत लाभ दिला आहे.

- राजेंद्र कदम, बागायतदार

      वर्ष            लाभार्थी

* 2012-13    1500

* 2013-14    1024

* 2014-15    1776

* 2015-16    3012

* 2016-17   10,603

* 2017-17   14,456

Web Title: 55 crore dividend to fourteen thousand farmers