रत्नागिरीत रुग्णसंख्या घटली, मृतांमुळे चिंता वाढली

6 patients dead cause corona in ratnagiri and 94 corona positive are found today
6 patients dead cause corona in ratnagiri and 94 corona positive are found today

रत्नागिरी : जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशी कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी असून रविवारी सायंकाळपर्यंत चोविस तासात 94 नवे रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात एकुण बाधितांचा आकडा 6 हजार 699 झाला आहे. गेल्या चोवीस तासात सहा आणि शनिवारी मृत पावलेले दोघे मिळून आठ कोरोनाबाधित मृतांमध्ये भर पडली आहे. जिल्ह्यात एकाच दिवशी सहाजणांचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा प्रशासनाला उपचार यंत्रणा राबविण्यासाठी कडक पावले उचलावी लागणार आहेत. 

एकुण कोरोना मृतांची संख्या 217 झाली आहे. शहरांसह गावांमधील लोकांच्या तपासण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. तुलनेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा उद्रेक झालेला नाही. नवीन रुग्णांची भर पडत असली तरीही रत्नागिरी, चिपळूण तालुक्यात ही संख्या वाढत आहे. मागील चोवीस तासातील 94 बाधितांमध्ये आरटीपीसीआर चाचणीत 60, तर अँटिजेन चाचणीत 34 रुग्णांचा समावेश आहे. त्यात मंडणगडमध्ये 2 रुग्ण, दापोली 2, खेड 3, गुहागर 13, चिपळूण 18, संगमेश्वर 13, रत्नागिरी 33, लांजा 5 आणि राजापूर तालुक्यात 5 रुग्ण सापडले. 

आतापर्यंत 38 हजार 901 जणांच्या चाचण्या झाल्या असून 6 हजार 699 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, तर 32 हजार 190 जणांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत. नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी असले तरीही रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढता आहे. दोन दिवसात आठ रुग्ण मृत पावले आहेत. रविवारी एकाच दिवसात सहा जणांची भर पडली आहे. मृतांमध्ये चिपळूणमधील 2, खेड मधील 2, संमगमेश्वर 2, गुहागर 1 आणि रत्नागिरीतील एका रुग्णाचा समावेश आहे. 

रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 63 तर चिपळूण तालुक्यात 51 रुग्ण मृत पावले आहेत. तर खेड 37, दापोली 25 आणि संगमेश्वर तालुक्यात 19 मृत आहेत. ही चिंताजनक बाब असून मृत्यूदर पुन्हा 3.23 टक्के झाला आहे. यामध्ये 32 वर्षीय तरुणांचाही मृतामध्ये समावेश आहे. दिवसभरात 235 रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात 4,749 रुग्ण आतापर्यंत बरे झालेले असून 1,513 बाधित उपचार घेत आहेत. मृत्यूचा दर वाढत असताना बरे होण्याचा दरही 70.89 टक्के आहे.

दरम्यान, रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक रुग्ण रत्नागिरी शहरातील आहेत. त्याशिवाय जयगड परिसरात नव्याने 3 रुग्ण सापडले आहेत. नेवरे येथेही 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तसेच कसोप येथे 1, पावस येथे 1, बंदर रोड 2, शिरगाव 1, टिळक आळी 1, सहकार नगर 1, कुवारबाव 1, साळवी स्टॉप 1, लांजा 1, दांडे आडोम 1, भांबेड 1, मुरुगवाडा 1 रुग्ण आहे.

आजचे बाधित रुग्ण  - 91

एकुण बाधित        - 6,699

एकुण मृत            -    217

होम क्वारंटाईन     - 4,081

एकुण तपासणी    - 38,901

बरे झालेले रुग्ण    - 4,749

उपचाराखालील     -1,513

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com