रत्नागिरी : अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya) मुहूर्तावर हापूस बाजारात पाठविण्यासाठी आंबा बागायतदारांची लगबग सुरू आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांत ५५ ते ६० हजार पेट्या कोकणातून वाशी बाजार समितीमध्ये (Vashi Market Committee) पोहोचल्या आहेत. हापूसची (Ratnagiri Hapus Mango) आवक वाढल्यामुळे बाजारात दर्जेदार फळाला डझनचा दर ७०० रुपये आहे. एप्रिलच्या अखेरीस दर खाली आल्यामुळे बागायतदारांची चलबिचल सुरू झाली असून, यंदा उत्पादन कमी असल्याने खर्च भरुन कसा निघणार, अशी चिंता सतावत आहे.