आंबा महोत्सवातून सत्तर लाख रुपयांच्या हापूसची विक्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जून 2019

रत्नागिरी - परजिल्ह्यातीव आंबा महोत्सवात रत्नागिरीतील बागायतदारांनी सहभाग घेत थेट विक्रीचा फंडा यशस्वी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जालना, औरंगाबाद, वर्सोवा आणि लातूर येथील महोत्सात झालेल्या रत्नागिरी हापूसच्या विक्रितून सुमारे 70 लाख रुपयांची उलाढाल झाली .

रत्नागिरी - परजिल्ह्यातीव आंबा महोत्सवात रत्नागिरीतील बागायतदारांनी सहभाग घेत थेट विक्रीचा फंडा यशस्वी केला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे जालना, औरंगाबाद, वर्सोवा आणि लातूर येथील महोत्सात झालेल्या रत्नागिरी हापूसच्या विक्रितून सुमारे 70 लाख रुपयांची उलाढाल झाली . सुमारे पंधरा बागायतदारांनी या महोत्सवात जाणे पसंत केले होते. त्या शेतकऱ्यांचा बाजार समितीतर्फे सत्कार करण्यात आला.

रत्नागिरीचे सभापती दत्तात्रय ढवळे, उपसभापती संजय आयरे, संचालक आणि सचिवांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या सत्कारात आंबा बागायतदार विजय मोहिते, सुभाष भुवड, शरद गोंदभरे, पंकज वेदरे, पराग वेदरे, अनिल वेदरे, दिंगबर मयेकर, निलेश चव्हाण, विपुल गोंदभरे, मारुती साळुंखे यांचा समावेश होता. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात वाशीसह अन्य ठिकाणच्या मार्केटमध्ये आवक वाढल्यामुळे दरावर परिणाम झाला होता.

दर घसरल्याने बहूतांश बागायतदार कॅनिंगकडे वळले. गतवर्षी बाजार समितीने नवनवीन बाजारपेठांच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत शेतकरी पोचावा यासाठी परजिल्ह्यातील आंबा महोत्सवांमध्ये सहभागी होण्याची संकल्पना लढविली होती. माजी सभापती मधुकर दळवी यांनी त्याला पाठबळ दिले होते. 

पहिला महोत्सव वर्सोवा येथे झाला. तिथे 700 पेट्या विक्रीला गेल्या असून सुमारे सात ते आठ लाखाची उलाढाल झाली. औरंगाबादमध्ये 1500 पेट्यांची विक्री झाली. त्यात सुमारे 35 लाख रुपयांहून अधिकचे आंबे विक्रीला गेले. जालन्यामध्ये 1000 पेट्यांमधून 18 ते 20 लाखाची तर लातूरमध्ये 600 पेट्या विक्रीला गेल्या 8 लाखांची उलाढाल झाली. या महोत्सवामंध्ये हापूसला डझनाचा दर 250 रुपयांपासून ते 800 रुपयांपर्यंत मिळाला होता. औरंगाबादला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुहे चार दिवसांचा महोत्सव लांबला. त्याचा फायदा बागायतदारांना मिळाला.

परजिल्ह्यात जाण्याचे बागायतदारांना धाडस होत नव्हते. ती संधी बाजार समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली. त्यातून थेट ग्राहकांपर्यंत हापूस पोचला असून बागायतदारांना तेवढाच लाभ मिळाला आहे.

- मधुकर दळवी, संचालक
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 70 lakh rupees Hapus sell in Mango Festival