700 साहसवीरांनी घेतला रायगड प्रदक्षिणेचा आनंद

सुनील पाटकर
सोमवार, 24 डिसेंबर 2018

महाड : खडतर वाटा... दमछाक होणारी चढण....अन् रायगडच्या विपूल वनसंपदेचा अनुभव घेत 700 साहसवीरांनी रायगड प्रदक्षिणेचा आनंद घेत प्रदक्षिणा पूर्ण केली. चार वर्षांच्या चिमुकल्या पासुन सत्तर वर्षापर्यंतच्या वृध्दांपर्यंत सारे यात सहभागी झाले. रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अदिती तटकरे व जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनीही या प्रदक्षिणेत काही अंतर चालत प्रदक्षिणेचा अनुभव घेतला. 

महाड युथ क्लब व रायगड जिल्हापरिषदेच्यावतीने 23 डिसेंबरला हि रायगड प्रदक्षिणा पार पडली. राज्याच्या विविध भागातून आलेल्या प्रदक्षिणार्थीसह एमआयडिसीचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब झंजे,सिईटिपीचे व्यवस्थापक जयदीप काळे, उद्योजक संजय जगताप  उपस्थित होते. रायगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचाड गावा पासुन कडाक्याच्या थंडीत सकाळी सहा वाजता स्पर्धेला सुरुवात झाली. यासाठी जणांचा गट या प्रमाणे दर पंधरा मिनिटाला गट सोडले जात होते. रायगड प्रदक्षिणेचे 15 किलोमीटरची प्रदक्षिणा तीन ते चार तासात अंतर पार करत सर्वांनी प्रदक्षिणा पूर्ण केली. महाड येथील डॉ. दिगंबर गीते यांनी केवळ दोन तासांमध्ये ही अवघड प्रदक्षिणा पूर्ण केली. प्रदक्षिणा मार्गावर असलेल्या वनसंपदेची माहिती सर्वांना मिळावी यासाठी ठिकठिकाणी वनस्पतींची स्थानिक व शास्त्रीय नावे यांची माहिती देण्यात आली होती. याचा सहभागी प्रदक्षिणार्थीनी उपयोग झाला. सर्वांनी दमत-भागत, विश्रांती घेत, रायगडचा परिसर न्याहळत हि प्रदक्षिणा अखेर पूर्ण केली. प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या सर्व प्रदक्षिणार्थींना संस्थेतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी युथ क्लबचे अध्यक्ष संजीव मेहता, राजेश बुटाला, उद्य पयेलकर. संतोष सकपाळ, दिलिप धारप व राजू सासणे यांच्यासह युथ क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
 
Web Title: 700 adventurers took it The joy of the Raigad triangle