पाली - घरात आढळला आठ फूटी अजगर

अमित गवळे
शुक्रवार, 29 जून 2018

पाली (रायगड) : पावसाळा असल्याने साप व सरपटणारे जीव आपला अधिवास सोडून भक्ष्य व निवाऱ्याच्या शोधात अनावधानाने परिसरातील घरांमध्ये घुसतात. असाच एक जवळपास आठ फूटी अजगर येथील मधल्या आळीत राहणारे भानुशाली यांच्या इमारतीमधील खोलीत सोमवारी (ता. 25) शिरला. सर्प मित्र व अंनिस कार्यकर्त्यांच्या मदतीने या अजगराला पकडून सुखरूप जंगलात सोडण्यात आले.

घरात भल्ला मोठा अजगर पाहून घरतल्यांची भंम्बेरी उडाली. मग अंनिस सुधागड तालुका प्रधान सचिव अमित निंबाळकर यांना बोलविण्यात आले. त्यांनी सर्पमित्र नरेश मोहिते यांना बोलावून या भल्यामोठ्या अजगरला शिताफीने पकडले. त्यानंतर नुकतेच अजगरला सुखरूप जंगलात सोडण्यात आले. 

Web Title: 8 ft python found in home pali raigad