शीळ धरणातून 8 किमी समांतर वाहिनी

शीळ धरणातून 8 किमी समांतर वाहिनी

रत्नागिरी - शिवसेना - भाजपमध्ये मोठे राजकारण घडलेल्या शहरातील सुधारित नळपाणी योजनेच्या कामाला गती मिळाली आहे. शीळ जॅकवेल ते साळवी स्टॉप येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 8 किमीचे खोदकाम सुरू आहे. समांतर जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. येत्या आठ दिवसांत पाईप जोडून होतील. सुमारे पंधरा ते वीस टक्के पाणी गळती थांबेल. शहरातील पाणी वितरणही सुधारण्याची अपेक्षा आहे. 

शहरासाठी सुमारे 64 कोटींची सुधारित पाणी योजना मंजूर झाली. मात्र सुरवात झाली श्रेयवादावरून. भाजप, शिवसेनेत ही स्पर्धा रंगली. प्रेझेंटेशनवरून वाद निर्माण झाला. लगबगीने मुख्यमंत्र्यांच्या हस्त ई-उद्घाटन करण्यात आले. मात्र ठेकेदाराने फेरमूल्यांकनमध्ये 8 कोटी रुपये वाढीव दर दिला. त्याला मंजुरी मिळण्यासाठी पालिका सभागृहामध्ये विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये वाद झाला. अखेर बहुमताच्या जोरावर वाढीव दराला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर पावसापूर्वीच ठेकेदाराला काम करण्याचे आदेश पालिकेने दिले. टप्प्याटप्प्याने त्यांनी कामाला सुरवात केली. मात्र पावसानंतर खर्‍या अर्थाने पाणी योजनेच्या कामाला गती आली.

शीळ जॅकवेल ते साळवी स्टॉपपर्यंत 8 किमीच्या समांतर वाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले. त्यासाठी लागणारे उच्च दर्जाचे पाईप मागविण्यात आले आहेत. आठ दिवसांत पाईप येणार असून त्यानंतर तत्काळ ते जोडून पाण्याची उचल सुरू केली जाणार आहे. मुख्य जलवाहिनीवरच सुमारे 15 ते 20 टक्के पाणी गळती आहे. शहरातील अंतर्गत गळती अशी एकूण 40 टक्के पाणी गळती असल्याने शहरवासीयांना मुबलक पाणी मिळत नाही.

सुधारित नळपाणी योजनेचे काम युद्धपातळवर सुरू आहे. शीळ जॅकवेल ते जलशुद्धीकरण केंद्र अशी मुख्य जलवाहिनी बदलण्यात येत आहे. खोदकाम अंतिम टप्प्यात आहे. या महिन्याच्या अखेरी पाईप येऊन पडतील. त्यामुळे 15 ते 20 टक्के पाणी गळती कमी होईल. 

- राहुल पंडित, नगराध्यक्ष-रत्नागिरी पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com