Child Abuse Cases
Child Abuse Casesesakal

Child Abuse Cases : बाल लैंगिक शोषणाच्या वर्षभरात तब्बल 84 घटना; तपासात धक्कादायक माहिती समोर, 89 जणांविरुद्ध गुन्हे दाखल

रत्नागिरी जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाच्या (Child Abuse Cases) घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेची बाब आहे.
Summary

जवळच्या नात्यातील व्यक्तींकडूनच बालकांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे उघड झाले आहे.

रत्नागिरी : जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाच्या (Child Abuse Cases) घटनांमध्ये होणारी वाढ चिंतेची बाब आहे. गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात बाल लैंगिक शोषणाचे तब्बल ८४ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ८९ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस दलाने दिली.

मात्र, यामध्ये संशयित आरोपी जवळचेच असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. सध्या लहान मुलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने हा काळ खूपच चिंता निर्माण करणारा आहे. घर, शाळा, सार्वजनिक ठिकाणी मुलांची सुरक्षितता जपणे अवघड झाले आहे.

Child Abuse Cases
गोचिडाप्रमाणं जनतेचं रक्त पिऊन जगलात, म्हणून तुमच्यावर तुरुंगात पिठलं-भाकरी खायची वेळ आली; जरांगेंचा भुजबळांवर पलटवार

बरेचदा जवळच्या नात्यातील व्यक्तींकडूनच बालकांच्या असाह्यतेचा गैरफायदा घेतला जात असल्याचे उघड झाले आहे. अनेकांच्या वासनांना अजाण बालके बळी पडत आहेत. त्यामुळे लहान मुलांवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याची पालकांची जबादारी वाढली आहे. जिल्हा पोलिसदलाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून तर बाललैंगिक शोषणाच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. अलीकडच्या काळात या घटना वाढू लागल्याचे दिसत आहे.

Child Abuse Cases
जरांगेंचं आवाहन अन् मराठ्यांसाठी उदयनराजे-शिवेंद्रराजे मैदानात; म्हणाले, आरक्षणाचा प्रश्‍‍न मिटवा नाही तर..

मुलांना घरातील जवळच्या नात्यातील व्यक्तीवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे सोपवले जाते; मात्र, ही जवळची वाटणारी माणसेच विश्वासघात करतात आणि निष्पाप बालके त्यांच्या अत्याचाराचे बळी ठरतात. दहा महिन्याच्या कालावधीत असे ८४ गुन्हे जिल्ह्यात घडले आहेत. या आरोपीवर ३५४ आणि ३७६ कलमाखाली तसेच पोक्सोअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Child Abuse Cases
CM Siddaramaiah : 'विरोधी पक्षनेता कोणीही असो, सरकारला फरक पडत नाही'; मुख्यमंत्र्यांनी भाजपचा घेतला समाचार

कोणत्या महिन्यात किती गुन्हे?

  • जानेवारी - ६

  • फेब्रुवारी - ६

  • मार्च - ५

  • एप्रिल - ८

  • मे - १०

  • जून - ११

  • जुलै - १०

  • ऑगस्ट - ८

  • सप्टेंबर - ०

  • ऑक्टोबर - ४

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com