Karnataka Politics CM Siddaramaiah
Karnataka Politics CM Siddaramaiahesakal

CM Siddaramaiah : 'विरोधी पक्षनेता कोणीही असो, सरकारला फरक पडत नाही'; मुख्यमंत्र्यांनी भाजपचा घेतला समाचार

प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्याच्या निवडीनंतर भाजपमध्ये (BJP) असंतोष पसरला आहे.
Summary

निवडणुकीत केवळ ६६ जागा मिळाल्याने ते विरोधी पक्षात बसले आहेत.

बंगळूर : प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षाच्या नेत्याच्या निवडीनंतर भाजपमध्ये (BJP) असंतोष पसरला आहे. काही दिवस प्रतिक्षा करून पहा, आणखी अनेक घडामोडी घडलेल्या दिसतील. विरोधीपक्ष नेतेपदी कोणीही असले तरी कॉंग्रेस सरकारवर (Congress) त्याचा परिणाम होणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) म्हणाले.

Karnataka Politics CM Siddaramaiah
गोचिडाप्रमाणं जनतेचं रक्त पिऊन जगलात, म्हणून तुमच्यावर तुरुंगात पिठलं-भाकरी खायची वेळ आली; जरांगेंचा भुजबळांवर पलटवार

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘‘जनतेच्या आशीर्वादाने सरकार स्थापन करणारी काँग्रेस जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करत आहे. सरकार राज्यात द्वेषाचे राजकारण न करता शांततापूर्ण वातावरण निर्माण करत आहे. आज निवडणूक झाली तरी भाजप पुन्हा सत्तेत येईल, हा येडियुराप्पा (BS Yediyurappa) यांचा दावा ह निव्वळ भ्रम आहे.

निवडणुकीत केवळ ६६ जागा मिळाल्याने ते विरोधी पक्षात बसले आहेत. रमेश जारकीहोळी, बसनगौडा पाटील-यत्नाळ, अरविंद बेल्लद यांच्यासह त्यांच्या पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. कारण येडियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र यांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले आहे.’’

Karnataka Politics CM Siddaramaiah
Maratha Reservation : मनोज जरांगेंना आव्हान कशासाठी? आपण एकमेकांचे वैरी नाही; प्रकाश आंबेडकरांचे भुजबळांवर टीकास्त्र

भाजपच्या काँग्रेसविरोधातील पोस्टर आंदोलनावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री म्हणाले की, जनतेने भाजपला योग्य धडा शिकवला आहे. भाजप आणि धजदसोबत आघाडीचे सरकार स्थापन करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले. मात्र जनतेने काँग्रेस पक्षाला १३५ जागा दिल्याने त्यांची चिंता वाढली आहे. ते वैतागून निरर्थक विधाने करत आहेत.

कुमारस्वामींच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, ‘‘कुमारस्वामी यांनी केलेले आरोप कधीही सिद्ध केलेले नाहीत. ते द्वेष आणि मत्सराचे राजकारण करत आहेत. धजद आता ३८ जागावरून १९ जागावर आला आहे. त्यांच्या खोट्या आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही.’’

Karnataka Politics CM Siddaramaiah
जरांगेंचं आवाहन अन् मराठ्यांसाठी उदयनराजे-शिवेंद्रराजे मैदानात; म्हणाले, आरक्षणाचा प्रश्‍‍न मिटवा नाही तर..

वीजचोरी करणाऱ्या कुमारस्वामींनी नैतिकता गमावली

माजी मुख्यमंत्री असताना वीजचोरी करणाऱ्या कुमारस्वामींना अशी विधाने करण्याची नैतिकता नाही. दंड भरून त्यांनी वीजचोरीचा गुन्हा स्वीकारला. गुन्हा लहान असो वा मोठा, हा गुन्हा आहे. त्यांच्याकडे टीका करण्याची नैतिकता नसल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com