esakal | आइस क्यूबमुळे चेहऱ्याला होतात फायदे; जाणून घ्या वापरण्याची पद्धत
sakal

बोलून बातमी शोधा

आइस क्यूबमुळे चेहऱ्याला होतात फायदे; जाणून घ्या वापरण्याची पद्धत

आइस क्यूबमुळे चेहऱ्याला होतात फायदे; जाणून घ्या वापरण्याची पद्धत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आपल्या स्कीनचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी महिला नेहमी अनेक गोष्टी ट्राय करत असतात. परंतु सोप्या पद्धतीनेही तुम्ही स्कीनची, त्वचेची काळजी घेऊ शकता. यामध्ये कॉफी आइस क्यूबचा वापर तुम्हाला फायद्याचा ठरू शकतो. कॉफीच्या बर्फाचे तुकडे चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यचे काम करतात. कारण कॉफीमध्ये बरेच पोषक घटक आणि अॅंटी ऑक्सिडंट असतात, जे चेहऱ्यावरील नको असणारे घटक दूर करण्यास मदत करतात. कॉफी ही एक असा घटक आहे, जो त्वेचेच्या खोलवर जाऊन अनावश्यक घटक साफ करते. तसेच मृत केशीकांचे विघटन करण्यासही मदत करते. तुमच्या रोजच्या स्कीनकेअर रुटीनमध्ये तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे चेहऱ्यावरील प्रॉब्लेम्स, फाईन-लाईन्स, सुरकुत्या, काळे डाग, पिंपल असे प्रॉब्लेम दूर होतात. आज आपण जाणून घेणार आहोत याचे फायदे आणि याला बनवण्याची पद्धती..

आइस क्यूब बनवण्याची पद्धत

आइस क्यूब बनवण्याची पद्धत सोपी आहे. यासाठी तुम्हाला स्ट्रॉंग ऑरगॅनिक कॉफी बनवून आईस ट्रेमध्ये ठेवावी लागेल. कॉफी बनवण्यासाठी एक कप गरम पाण्यामध्ये २-३ मोठे चमचे इन्स्टंट ऑरगॅनिक कॉफी घ्या. त्यानंतर या मिश्रणाला थंड होऊ द्या आणि हे मिश्रण ट्रेमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवून द्या. आवश्यक असल्यास तुम्ही यामध्ये थोड्या प्रमाणात मधही घालू शकता आणि मग हे तयार मिश्रण ट्रेमध्ये ठेवून फ्रीजरला ठेवू शकता.

हेही वाचा: घरी बॉडी पॉलिशिंग करताय? मग या गोष्टींची काळजी घ्या!

आइस क्यूबचा कसा करावा वापर

आइस क्यूबचा वापर करण्यासाठी सुरूवातीला तुमची स्किन क्लीन करून घ्या. यानंतर एका सुखी कपड्यामध्ये हे बर्फाचे तुकडे एकत्र करा. यानंतर या आइस क्युबना सर्क्युलर मोशन पद्धतीने चेहऱ्यावर रब करू शकता. त्यानंतर ४-५ मिनिटांसाठी हलक्या हाताने चेहरा मसाज करा आणि काही काळासाठी तो तसाच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने तुमचा चेहरा साफ करा. ही प्रक्रिया करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आइस क्यूब हे सुती कपड्यामध्ये गुंडाळून वापरायचे आहेत.

आइस क्युबचे फायदे

  • तुम्ही जर कॉपीला तुमच्या स्क्रीनवर अॅप्लाय करणार असाल तर यामुळे तुमच्या रक्त प्रवाहामध्ये सुधारणा होते. शिवाय त्वचा टाइटन राहण्यास मदत होते. काही कारणास्तव डोळ्यांना येणारी सूज कमी करण्यासही याची मदत होते.

  • कॉफीमध्ये एंटीऑक्सीडेंटचे प्रमाण तुमच्या स्किनसाठी फायद्याचे मानले जाते. सूर्याकिरणांपासून बचावासाठी हे तुमची मदत करते आणि यामुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो.

  • जर तुमची स्किन तेलकट (ऑईली) असेल तर ही ट्रीक तुम्हाला उपयोगी पडेल. चेहऱ्यावरील हा अतिरिक्त तेलकटपणा कमी करण्याचे किंवा नियंत्रण ठेवण्याचे काम करते.

  • कॉफी आइस क्युब तुमच्या स्किनला एक उत्तम लुक देते. ज्यामुळे तुमची स्किन अधिक तजेलदार, सुंदर आणि चिर:तरुण दिसते.

हेही वाचा: मोबाईल, टीव्हीमुळे विकाराला निमंत्रण! लहान मुलांकडून अतिरेकी वापर

loading image