सावंतवाडी तालुक्‍यातील ९० टक्के शाळा डिजिटल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सावंतवाडी - लोकांच्या पुढाकाराने तालुक्‍यातील तब्बल ९० टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. लोकांच्या आणि शिक्षकांच्या सकारात्मक धोरणामुळे हे आव्हान शक्‍य झाले आहे. आता भविष्यात हे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करून जिल्ह्यासह राज्याला आदर्श घालून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा दावा गटशिक्षणाधिकारी शिवाजीराव देसाई यांनी केला.

जिल्हा परिषदेच्या शाळांत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शासनाकडून डिजिटल शाळा हा उपक्रम राबविण्यात आला. पहिल्या टप्प्यात शाळा डिजिटल करण्यासाठी आवश्‍यक असलेला निधी लोकसहभागातून उभारण्यात यावा अशी तजवीज केली.

त्यामुळे आपली मुलेसुध्दा दर्जेदार शिक्षण मिळविण्यासाठी तयार व्हावीत यासाठी शहरी भागासह विशेषत: ग्रामीण भागातील शाळा डिजिटल करण्यासाठी प्रयत्न झाले. यासाठी काही दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि सामाजिक काम करणाऱ्या संस्थांनी आपापल्या परीने लोकवर्गणी उभारून शाळा डिजिटल करण्याचा आपला मानस व्यक्त केला. तो यशस्वीही करून दाखविला आहे.

या सर्व प्रवाहात तालुक्‍यातील ९० टक्के शाळा डिजिटल झाल्या आहेत. उर्वरित शाळा या प्रक्रियेत घेण्यासाठी प्रयत्न केला जात आहेत. लोकांच्या पुढाकाराने त्या नक्कीच मुख्य प्रवाहात घेतल्या जातील, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.
 
शाळा डिजिटल झाल्यास विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळण्यास मदत होते. एखादी गोष्ट मुलांना पुस्तकात समजून देण्यापेक्षा टीव्ही स्क्रीनवर दिसल्यास तत्काळ आत्मसात होण्यास मदत होते. त्यामुळे याचा आदर्श आता अन्य शाळांनी घेणे गरजेचे आहे. उद्याची चांगली पिढी घडविण्यासाठी आता सगळ्यांनीच पुढाकार घ्यावा.
- शिवाजीराव देसाई, गटशिक्षणाधिकारी

Web Title: 90% digital school in sawantwadi tahsil