

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे २५ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
esakal
Rural Hospital Case : उंबर्डे भुतेश्वरवाडी येथील सुंदरा प्रकाश शिवगण (वय २५) हिचा आज उपचारादरम्यान सायंकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यामुळेच तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केल्याने रुग्णालय परिसरात तणाव निर्माण झाला होता.