esakal | दोडामार्ग येथे आमने-सामनेप्रकरणी 18 जणांवर गुन्हे; भाजप-शिवसेनेमधील वाद
sakal

बोलून बातमी शोधा

दोडामार्ग येथे आमने-सामनेप्रकरणी 18 जणांवर गुन्हे

दोडामार्ग पोलिस ठाण्याच्या निरीक्षक रिझवाना नदाफ यांनी त्याबाबत माहिती दिली आहे.

दोडामार्ग येथे आमने-सामनेप्रकरणी 18 जणांवर गुन्हे

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : येथील बाजारपेठेत रविवारी (ता.१८) सकाळी भाजपा व शिवसेना कार्यकर्ते आमने-सामने आल्यानंतर झालेल्या कथीत राड्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते अशा १८ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दोडामार्ग पोलिस ठाण्याच्या निरीक्षक रिझवाना नदाफ यांनी त्याबाबत माहिती दिली आहे.

हेही वाचा: बांदा ते दोडामार्ग होणार 'औद्योगिक कॉरिडॉर'; राणेंचा निर्णय

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी निर्गमित केलेल्या जमावबंदी आदेशांचे पालन न करणे तसेच कोविड -१९ रोगाच्या नियमांचे पालन न करणे व सीआरपीसी १४९ प्रमाणे दिलेल्या नोटिशीचा भंग केल्याने गैर कायदा जमाव करून दोडामार्ग गांधी चौक येथे जमून एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी तसेच एकमेकांना चिथावणी दिली म्हणून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.

हेही वाचा: चंदगड-दोडामार्ग मार्गावर गोवा बनावटीची दारू जप्त

याप्रकरणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबूराव धुरी (रा. भिकेकोनाळ), भगवान गवस (मणेरी), सज्जन धाऊसकर (सासोली), विनिता घाडी (कोनाळकट्टा), रामदास मेस्त्री ( कुडासे), बबलू पांगम (आयी), आत्माराम देसाई (कुडासे), बाबाजी देसाई (कुडासे ), मिलिंद नाईक ( कळणे) तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी (कळणे), पंचायत समिती सदस्य बाळा नाईक (आंबेली), भाजप तालुकाध्यक्ष प्रवीण गवस ( मणेरी ), देवेंद्र शेटकर (खोक्रल), संतोष नानचे, चेतन चव्हाण (दोडामार्ग), दीपक गवस (खोक्रल ), श्री. फुलारी, विशाल मणेरीकर (दोडामार्ग) आदींवर गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक महेंद्र घाग हे करीत आहेत.

loading image