esakal | गणेशोत्सवाआधी दोन दिवस सुरू होणारा उत्सव
sakal

बोलून बातमी शोधा

ganesh utsav

गणेशोत्सवाआधी दोन दिवस सुरू होणारा उत्सव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवरूख : मोरगावच्या मयुरेश्‍वराप्रमाणे साजरा होणारा आणि कोकणातील गणेशोत्सवाची सुरवात म्हणून प्रसिद्ध असलेला तसेच भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असा पाच दिवस चालणारा देवरूखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला या वर्षी ७ सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

नियमित गणेशोत्सवाआधी दोन दिवस सुरू होणारा हा उत्सव गेली ३७५ वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. याशिवाय देवरूखातील श्रीकांत जोशी यांच्याही घरी याच दिवशी गणरायाचे आगमन होणार असून याही उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

हेही वाचा: Guhagar : गणेशोत्सव आनंदाने साजरा करावा

गेली ३७५ वर्षे या उत्सवाची ही परंपरा कायम आहे. हिंदू धर्मात सर्वच ठिकाणी गणेशाच्या मूर्तीची भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रतिष्ठापना होते. श्रीकांत जोशी आणि चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला शुद्ध प्रतिपदेला सुरवात होते.

त्यामुळे या उत्सवाने कोकणातील गणेशोत्सवाची सुरवात होते.गेल्या वर्षी कोरोनामुळे हे दोन्ही उत्सव अत्यंत साधेपणाने साजरे झाले होते. या वर्षीही पोलिसांच्या सूचनेनुसार कोरोनाचे सर्व नियम पाळूनच हे उत्सव साजरे केले जाणार आहेत. ७ तारखेला सकाळी या दोन्ही मूर्तींचे आगमन होणार आहे.

loading image
go to top