आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

आदर्श ग्रामसेवक  पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी जिल्ह्यातील आठ ग्रामसेवकांची निवड करण्यात आली. हे पुरस्कार २०१५-१६ मध्ये केलेल्या कामांचे मूल्यांकन करून जाहीर करण्यात आले.

जिल्हा परिषद प्रशासनातर्फे २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठीच्या आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी जिल्ह्यातून प्रस्ताव मागविण्यात आले होते. यासाठी ११ प्रस्ताव प्राप्त झाले. एका गटातून एक याप्रमाणे आठ तालुक्‍यातून प्रत्येकी एक याप्रमाणे प्रस्तवांची गुणांकनानुसार सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या ग्रामसेवकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

यामध्ये दोडामार्ग (मोरगाव-आडाळी), ग्रामसेवक श्रीमती नम्रता प्रभाकर राणे, सावंतवाडी (गुळदुवे-नाणोस) ग्रामसेवक भालचंद्र अंकुश सावंत, वेंगुर्ले (आसोली) ग्रामसेवक- ज्ञानेश अंकुश करंगुटकर, कुडाळ (वाडोस) ग्रामवस्तार अधिकारी वैभव महादेव सावंत, मालवण (किर्लोस) ग्रामसेवक रामचंद्र रघुनाथ वनकर, कणकवली (तोंडवली-बावशी) ग्रामसेवक प्रशांत मधुकर वर्दम, देवगड (फणसे) ग्रामसेवक उज्ज्वल वामन झरकर, वैभववाडी (कुसूर) ग्रामसेवक घनश्‍याम शिवराम नावळे यांची पुरस्कारासाठी निवड झाली.

या निवडीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मूल्यांकन समितीने केलेल्या मूल्यांकनानुसार ४०० गुणांपैकी दोडामार्ग- २८६, सावंतवाडी- २९१.५० गुण, वेंगुर्ले- ३४५.९० गुण, कुडाळ- २७५.४४ गुण, मालवण- ३३९.४० गुण, कणकवली- ३१४ गुण, देवगड- ३७९ गुण, तर वैभववाडी ग्रामसेवकाला २४८ गुण मिळाले. यानुसार त्यांची निवड करण्यात आली असून, लवकरच या आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com