महत्त्वाकांक्षा बाळगून क्षमता सिद्ध करा - नारायण राणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

बांदा - प्रगतीचे बहुतांश मार्ग मी कोकणात आणले. आता महत्त्वाकांक्षा डोळ्यांसमोर ठेवून आपली कुवत व क्षमता सिद्ध करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांनी केले. ते बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई आयोजित दहाव्या नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

बांदा - प्रगतीचे बहुतांश मार्ग मी कोकणात आणले. आता महत्त्वाकांक्षा डोळ्यांसमोर ठेवून आपली कुवत व क्षमता सिद्ध करा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांनी केले. ते बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई आयोजित दहाव्या नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप, संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विश्‍वासराव मेंहदळे, महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव लोहार, जिल्हा बॅंक अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब, बांदा शहर अध्यक्ष जावेद खतीब, बांदा सरपंच मंदार कल्याणकर, अशोक सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, सभापती अकुंश जाधव, आत्माराम पालेकर, संदीप कुडतरकर, संस्थेचे कार्याध्यक्ष आबा तोरसकर, कल्पना तोरसकर, प्रा. प्रवीण बांदेकर, मालवणी कवी दादा मडकईकर, गुरुनाथ पेडणेकर, प्रमोद कामत, दिनेश साळगावकर, आनंद शिरवलकर, विनायक दळवी, स्वप्नील नाईक, व्यापारी संघाचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, शशी पित्रे, भाऊ वळंजू, ॲड वसंत भणगे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
श्री. राणे म्हणाले, ‘‘कोकणातील माणूस हा समाधानावर जगणारा असल्यामुळे जशी व्हायला पाहिजे तेवढी प्रगती कोकणाची झाली नाही.

परिणामी हातावर मोजण्याएवढेच युवक-युवती प्रगतीच्या दिशेने जातात. यामुळे विद्यार्थाने आतापासूनच महत्त्वाकांक्षा बाळगा उद्दिष्ट ठेवा आणि त्या दिशेने वाटचाल करा. या संस्थेतर्फे घेतलेल्या संमेलनातून विचार आत्मसात करा. तंत्रज्ञान, संस्कार, विज्ञानाबरोबरच योग्य ते शिक्षण घ्या. आपली प्रगती ही ज्ञानातूनच होईल. जग जसे गतिमान झाले आहे तसे अपणही गतिमान व्हायला हवे आणि अशा कार्यक्रमातून आपल्या कोकणातून साहित्यिक तयार व्हायला हवेत.’’ कार्यक्रमाच्या सुरवातीला ग्रंथ प्रदर्शन व संमेलनाचे उद्‌घाटन श्री. राणे यांच्या हस्ते झाले. या वेळी रमाकांत खलप, आबा तोरसकर यांनीही मार्गदर्शन केले. रश्‍मी नाईक यांनी सूत्रसंचालन केले. श्री. नाईक यांनी आभार मानले. 

कोकणी माणसाने आपला आळस झटकवून आपल्या हुशारीने कामाला लागले पाहिजे. आपली शाळा आपल्याला आदर्श ठरवत असते. कोकणात अशी काही संपत्ती आहे ज्याचा योग्य वापर केल्यास शेजारील देशसुद्धा आपल्यापर्यंत येऊ शकतात.
- विश्‍वासराव मेंहदळे, संमेलनाध्यक्ष

Web Title: The ability to prove the ambitions of ruling